*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.21.जिल्ह्यात एका महिन्यात तिसरा पोलीस अंमलदार लाच जाळ्यात अडकला.भोकर येथील पोलीस अंमलदार सुभाष कदम बकल नंबर 487 यांनी लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना जेरबंद केले आहे.
आज दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उपअधिक्षक डॉ.राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एक सापळा कार्यवाही भोकर येथे लावली.त्यामध्ये भोकर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अंमलदार सुभाष लोभाजी कदम बकल नंबर 487 यांना 25 हजार रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेर बंद केले आहे. या संदर्भाची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी व्यक्ती (त्यांचा एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करण्यासाठी, करून देण्यासाठी कायदेशीर फि व्यक्तीरिक्त अन्य प्रकारे लाचेची मागणी करीत असल्यास त्वरीत प्रभावाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. लाच मागणाऱ्यांविरुध्द कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे यांचा मोबाईल क्रमांक 9623999944, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197, कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02262-253512 आणि टो फ्रि क्रमांक 1064 वर सुध्दा लाच प्रकरणाची माहिती देवून मदत मागता येईल