KINWATTODAYSNEWS

सुभाष बाबू नायक राठोड यांची काँग्रेस ओबीसी आघाडीच्या नांदेड जिल्हा सचिव पदी नियुक्ती

किनवट प्रतिनिधी:
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे भूमिपुत्र अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार किनवट येथील युवानेते सुभाष बाबू नायक राठोड यांची काँग्रेस ओबीसी आघाडीच्या नांदेड जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असून 18 मार्च रोजी पक्षाच्या आढावा बैठकीत माजी शिक्षणमंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता किनवट तालुक्यात काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणीला जोर दिला असून तरुण व निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने दि 18 मार्च रोजी नांदेड येथील पक्ष कार्यालयात काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली असून या बैठकीत किनवट येथील काँग्रेसचे युवानेते सुभाष बाबू नायक राठोड यांच्या कार्याची दखल घेत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार त्यांची काँग्रेस ओबीसी आघाडीच्या नांदेड जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असून माजी शिक्षणमंत्री डी पी सावंत यांच्या हस्ते सुभाष नायक राठोड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी माजी आ अमर राजूरकर, ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नवीन राठोड,जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलिकर,माजी जि प सदस्यां मीनलताई खतगावकर, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, विजय देवडे लहानकर, प्राचार्य राजेंद्र केशवे,सुरेश पाटील सोळंखे,किसान काँग्रेस आघाडीचे किनवट तालुकाध्यक्ष संतोष अडकीने, किशन राठोड,वसंत राठोड,माजी नगरसेवक अभय महाजन, फारुख चव्हाण, शेख अनवर,
पक्षासाठी निष्ठेने काम केल्याची पावती म्हणून
पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवत काँग्रेस ओबीसी आघाडीचे जिल्हा सचिव म्हणून जवाबदारी दिली आहे. आगामी काळात नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाजाला काँग्रेस पक्षाला जोडण्यासाठी अथक परिश्रम घेऊन जबाबदारी सार्थ ठरवेन अशा प्रतिक्रिया सुभाषबाबू नायक राठोड यांनी नियुक्तीनंतर दिल्या आहेत या नियुक्ती बदल काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सुभाषबाबू नायक राठोड यांचे अभिनंदन होत आहे

155 Views
बातमी शेअर करा