*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.20.जिल्यात १५/०३/२०२३ ते दि.१९/ ०३/२०२३ रोजी कंधार तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपिट होऊन शेतक-यांच प्रचंड मोठया प्रमाणात पिकाचे नुकसान झालेले आहे.
शेतक-यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले गहु, हरबरा, ज्वारी आणि फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यंदाच्या वर्षी खरीब हंगामात सुध्दा अतिवृष्टीमुळ नुकसान झालेले आहे.आता रबी हंगामात अवकाळी पाऊसामुळे शेतक-याच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिंसकाऊन घेतलेला आहे.
त्यामुळे त्याला तात्काळ शासनाच्या वतीने हेक्टरी ५० हजार रुपये नकसान भरपाई देण्यात यावी.आसे निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष बळिराम पाटील पवार पंचायत समिती सदस्य उत्तमराव चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड अशोक पा कदम संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष कंधार नितीन पाटील कोकाटे अ.भा.छावा तालुका अध्यक्ष संभाजी पाटील लाडेकर सूदरसिंग जाधव त्रिभुवन पाटील मोरे सचिन जाधव व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.