किनवट/प्रतिनिधी: 18 रोजी किनवट शहरामध्ये रामनवमी, हनुमान जयंती,, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजान या सणांचे व उत्सवाचे अनुषंगाने किनवट शहरांमधील संवेदनशील भागात रूट मार्च घेण्यात आला.
रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाठोरे, पोलीस उपनिरीक्षक पवार ,पोलीस उपनिरीक्षक सावंत ,पोलीस उपनिरीक्षक चांद हे हजर होते तसेच पोलीस स्टेशनचे 22 पोलीस अंमलदार आणि 29 होमगार्ड सामील होते.
शासकीय वाहनावरील पी ए सिस्टीम वरून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज सोशल मीडियाद्वारे वायरल करू नये, समाजकंटकांचा उद्देश साध्य होऊ देऊ नये, जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशन मार्फत अशा समाजकंटकांवर लक्ष ठेवून असून कायदेशीर कारवाई केली जाईल म्हणून जनजागृती करण्यात आली .
138 Views