KINWATTODAYSNEWS

पेट्रोल पंपांवर ना हवा, ना पाणी; प्रसाधनगृह देखील नावालाच

किनवट/प्रतिनिधी
देशातील सर्वच पेट्रोल पंपांवर हवा, पाणी, प्रसाधनगृह आदी सुविधा या ग्राहकांसाठी उपलब्ध अती आवश्यक आहे; मात्र किनवट शहरातील व परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर या सुविधा केवळ नावालाच दिसून आल्या. आवश्यक असलेल्या सुविधा शहरातील कोणत्या पंपावर उपलब्ध आहेत, याची पाहणी केली असता हा प्रकार लक्षात आला.

शहरातील व शहर परिसरातील जवळपास सर्व पेट्रोल पंपांची तपासणी केली. यावेळी केवळ एकाच पंपांवर आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध असल्याचे दिसून आले. याबाबत नागरिकांना विचारले असता काहींनीच प्रतिक्रिया नोंदवली. यात एक जण म्हणाला की, किनवट शहरातील व परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर आवश्यक असलेल्या सुविधा मिळत नाहीत. यास अपवाद किनवट -घोटी रोडवरील गॅस गोडाऊन परिसरातील पेट्रोल पंप आहे तिथे सर्वच्या सर्व सुविधा अत्यंत उत्कृष्टपणे दिल्या जात आहेत या
ठिकाणी सर्व सुविधा सुस्थितीत आहेत. तर काही वाहनधारकांनी फारशी माहिती नसल्याचे सांगितले. या सुविधांचा वापर करता आला नाही; परंतु सर्वच ठिकाणी या गरजेच्या सुविधा असाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली प्रशासनाने याबाबत लक्ष देणे आवश्यक आहे.

शहर व परिसरातील पंपांची पाहणी केली असता बहुतांश पेट्रोल पंपावर वाहनात हवा भरण्यासाठी कॉम्प्रेसर लावलेले दिसले; परंतु अनेक दिवसांपासून

त्याचा वापर होत नसल्याचे परिस्थितीवरून दिसते. कॉम्प्रेसर शोभेची वस्तू बनली तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही अनेक पंपावर प्रसाधनगृह आडबाजूला व तसे नोटीस बोर्ड नसल्यामुळे ग्राहकाच्या लक्षात येत नाही. पेट्रोल पंपावरील सुविधा न दिल्यास तसे कारवाईचे अधिकार हे सन्माननीय • जिल्हाधिकारी साहेब यांना आहेत.

या पेट्रोल पंपांची तपासणी करून सुविधा उपलब्ध नसल्यास कारवाई करण्याचे आदेश आजपर्यंत निर्गमित झालेले नाहीत किंबहुना त्यांना पेट्रोल पंप धारकांना त्या सुविधा सुधारण्याची संधी उपलब्ध करून दिले अशी माहिती ही जनसामान्याला माहीत होईल अशा ठिकाणी दिलेली नाही. आज तागायत ग्राहकाला झालेला त्रास हा अक्षम्य असला तरी येणाऱ्या भविष्यामध्ये या सुविधा ह्या उपलब्ध व्हाव्या अशी जनसामान्या मध्ये बोलल्या जात आहे सध्याच्या परिस्थिती पेक्षा येणारी परिस्थिती ही उत्तम व चांगली यावी यासाठी ग्राहक आज रोजी सर्व सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी करत आहे.

276 Views
बातमी शेअर करा