KINWATTODAYSNEWS

लाचखोर पोलीस कॉन्स्टेबल कानगुले एसीबीच्या जाळ्यात

*अपघातात जप्त केलेली दुचाकी सोडण्यासाठी स्वीकारली १८०० रुपयांची लाच*

*कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या वाटेल भ्रष्टाचारी कर्मचारी साथीला*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.15.शहरातील भाग्यनगर पोलीस स्टेशनं येथे अपघातात जप्त केलेली दुचाकी,दुचाकी मालकास परत देण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी करून अठराशे रुपये रक्कम स्वीकारत असताना काल भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पो.कॉ.शिवाजी रामकिसन कानगुले यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

याप्रकरणी शिवाजी कानगुले याच्याविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबतीत अधिक माहिती अशी की,भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकी चालकाकडून एका महिलेचा किरकोळ अपघात झाला होता.

सदरील महिला तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती मात्र दुचाकी चालक आणि महिलेमध्ये तडजोड झाल्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले नाही.याच कारणाने दुचाकी जप्त करून पोलिसांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात लावली होती.

हे प्रकरण तडजोडीनंतर मिटल्याने सदरील दुचाकी आपणास परत मिळावी यासाठी तक्रारदाराने पोलीस कॉन्स्टेबल कानगुले यांच्याकडे मागणी केली.जप्त केलेली दुचाकी परत देण्यासाठी पाच हजार रुपये लागतील असे सांगत कानगुले यांनी तक्रारदाराकडून लगेच बाराशे रुपये स्वीकारले.त्यानंतर उर्वरित अठराशे रुपये मिळविण्यासाठी कानगुले यांनी तगादा लावला. कानगुळे यांचा रकमेसाठी तगादा आणि मिळत नसलेली दुचाकी यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने अखेर पोलीस कॉन्स्टेबल कानगुले यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली .

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल दिनांक १४ मार्च रोजी लावलेल्या सापळ्यात पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कानगुले १८०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना सापडले.ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक जमीर नाईक,नानासाहेब कदम,पोलीस कॉन्स्टेबल सचिन गायकवाड, हर्षद खान,ईश्वर जाधव, गजानन राऊत यांच्या पथकाने केली. दरम्यान सापळ्यात अडकलेला पोलीस कॉन्स्टेबल ग्रामीण पोलीस ठाण्यात असताना तेथील वाळू माफियांकडूनही हप्ते वसूल करत होता अशीही चर्चा होते आहे.

544 Views
बातमी शेअर करा