*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.10.नांदेड परीक्षेत्राचे कर्तव्यदक्ष पोलीस उपमहानिरीक्षक शशिकांत महावकर यांनी मागील दोन ते तीन आठवड्याखाली नांदेडचा पदभार स्विकारला त्या अगोदर नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक व फौजदाराच्या बदल्या केल्या आहेत.
काही ठाण्यातील पोलीस अधिकारी बदली होऊन गेले असले तरी काही पोलीस अधिकारी अध्याप बदली झाली असताना सुद्धा ठाणे सोडले नसल्यामुळे पोलीस उपमहानिरीक्षक शशिकांत महावरकर या बाबीकडे लक्ष देतील का ? प्रश्न चर्चेला जात आहे
शहरी भागात असो ग्रामीण भागात असो अगोदरच ठाण्यात पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी कमी पडत आहेत ऐन वेळी सुरक्षाचा प्रश्न निर्माण झाला तरी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अतिशय सक्षम असल्यामुळे वेळ प्रसंग हाणून पडतात ही जरी कौतुकास्पद बाब असली तरी ज्या पोलीस अधिकाऱ्या बदल्या झाल्या आहेत त्यांनी ठाणे का सोडत नाहीत यावर मोठया प्रमाणात चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे.
गेल्या महिन्यात नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या परंतु काही पोलीस अधिकारी बदली झालेल्या ठाण्यात जाऊन पदभार स्विकारला परंतु काही पोलीस अधिकारी अजून त्याच ठाण्यावर असल्यामुळे कमालीची चर्चा होताना ऐकावयास मिळत असल्यामुळे नूतन पोलीस उपमहानिरीक्षक महावरकर यांनी यांनी लक्ष देण्याची गरज भासत आहे.
नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या स्वाक्षरीने बदल्या करण्यात आल्या परंतु नायगाव हिमायतनगर भोकर आणि धर्माबाद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या बदल्या होऊन सुद्धा ठाणे सोडण्यास तयार नाहीत हे मात्र वास्तव चित्र आहे.
सदरचे पोलीस अधिकारी का ? सोडत नाहीत असा प्रश्न चर्चेला जात असल्याने पोलीस उपमहानिरीक्षक महावरकर यांच्यासह पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज आहे.