पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या पदावर श्री सुनील वारे(IRAS-2000)FA&CAO(1) पश्चिम रेल्वे मुंबई यांची 23.01.2023 रोजी च्या आदेशान्वये महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या पदावर प्रति नियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार धम्मज्योती गजभिये यांना महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले. सदर आदेशाविरुद्ध धम्मज्योती गजभिये यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण मुंबई येथे मूळ अर्ज क्रमांक 117/ 2023 दाखल केला होता. त्यावर सुनावणी अंती माननीय न्यायालयाने स्थगिती दिली होती. तथापी श्री धम्मज्योती गजभिये यांनी मान्यायालयात दाखल केलेल्या मूळ अर्ज मागे घेत असल्याचे नमूद केले. त्यानुसार मा. न्यायाधीकरणाने सदर मूळ अर्ज निकाली काढून दिनांक 27. 1. 2023 रोजी स्थगिती आदेश मागे घेतले आहेत. श्री सुनील वारे (IRAS-2000)FA&CAO(1) पश्चिम रेल्वे मुंबई यांची शासन आदेश दिनांक 23.1.2023 अन्वये महाराष्ट्र महासंचालक डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पदावर रुजू होण्यासाठी प्रिन्सिपल फायनान्शियल ॲडव्हायझर यांना श्री सुनील वारे यांना दिनांक 8 मार्च 2023 रोजी च्या पत्रान्वये कार्यमुक्त केले आहे. त्यानुसार त्यांना महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या पदावर दिनांक 8. 3. 2023 पासून रुजू करून घेण्यात येत आहे. श्री सुनील वारे यांनी महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या पदाचा पदभार आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून त्वरित स्वीकारावा असे आदेश महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी दिले आहेत.
श्री सुनील वारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) येथे महासंचालक पदाचा पदभार आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून स्वीकारला
342 Views