KINWATTODAYSNEWS

महिला दिनानिमित्त जे यु ऍग्री सायन्सेस कडून महिलांचा सन्मान

किनवट प्रतिनिधी
कृषी औषधी क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या जे यु ॲग्री सायन्सेस या कंपनीतर्फे आज मौजे भिंम पुर या गावात जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बेटी बचाव बेटी पढाव या राष्ट्रीय अभियानासह सेंद्रिय शेती करण्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

मागील आठ वर्षापासून किनवट सारख्या मागास दुर्गम तालुक्यात औषधी क्षेत्रात प्रसिद्ध असलेली जे यु ॲग्री सायन्सेस ही कंपनी कार्यरत असून या कंपनीतर्फे माता आणि माती या उपक्रमाद्वारे शेतकरी व महिलांमध्ये जनजागृती करण्यात येते. दरम्यान 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील मौजे भिंपुर या गावात जे यु ॲग्री सायन्सेस कंपनीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात किनवट पंचायत समितीच्या सभापती म्हणून काम पाहिलेल्या हिराबाई लक्ष्मण आडे, गावातील सरपंच सीताबाई किशन आत्राम, अंगणवाडी सेविका सौ मनीषा जगदीश मेश्राम, मानकरी प्रेमीला प्रभाकर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य प्रियंका रवी पवार या महिलांना कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर मुकुंदजी पांडे व सेल्स ऑफिसर सचिन जाधव यांनी मानचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला.

यावेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने क्रॉप डेव्हलपमेंट ऑफिसर दत्ता ढवळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की माता आणि माती या उपक्रमाद्वारे आमची कंपनी सेंद्रिय शेती करण्यावर भर देत आहे.रासायनिक शेती मधून होणारे नुकसान व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घ्यावे याबद्दल कंपनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करते. शेती वाचली तर सृष्टी वाचेल हा निर्धार करून शेतीचे संगोपन होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.यावेळी त्यांनी शेतीबरोबरच बेटी बचाव बेटी पढाव या राष्ट्रीय अभियानाचे महत्त्व गावकरयांना पटवून दिले. थेंबा थेंबा मधून येथे सामर्थ्याचा जागर व्हावा विश्वासाच्या कल्याणासाठी स्त्रीशक्तीचा जागर व्हावा अशा काव्यस्वरूपात ढवळे यांनी स्त्रीचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमास भिंमपुर येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

49 Views
बातमी शेअर करा