*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.8.राज्यातील बहुचर्चित कुष्णर धान्य घोटाळा प्रकरण हळूहळू बाजूला सारले जात असतानाच या व्यवसायिकांनी आता आपले पाऊल सीमावर्ती भागाकडे वळविले असून त्या धान्य तस्करांसाठी धान्य साठवणूक व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी धर्माबाद येथील बाळापूर येथील जागा सेफपॉइंट बनत आहे.
या व्यवसायाला ब्रेक लावत धान्याचा काळा बाजार करणार्या मंडळीवर अंकुश लावण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.
याच व्यवसायास स्थानिक पातळीवर पाठबळ देणार्या एकाची धान्य तस्कराचे खाजगी फोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.
त्याने खाजगीत बोलताना आता घाबरण्याचे कारण नाही,नांदेड येथील एका माजी आमदार पुत्राचे या व्यवसायात पदार्पण झाले असल्याचे म्हटले असल्याने ती बाब खरी की खोटी ? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
धर्माबाद शहरा जवळील बाळापूर शिवारात धान्या पासून(गहू, तांदूळ,ज्वारी,)या पासून मद्यार्क (दारू )निर्मिती करणारा कारखाना आहे.
त्या ठिकाणी गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणारा गहू,तांदूळ हे धान्य सर्रासपणे तालुक्या तालुक्या तुन स्वस्त धान्य दुकानदारा कडून कमी भावाने घेऊन ते जास्ती भावाने या कारखण्यास पुरविले जाते असी दबल्या आवाजात चर्चा आहे.
मुळात धर्माबाद तालुक्यात जेवढे धान्य उत्पादन एका हंगामामध्ये होत नाही त्यापेक्षा अधिक धान्य या ठिकाणी एका आठवड्यात या कंपनीला पुरविल्या जाते हे मात्र विशेष विचार करण्याची .
त्यामुळे उपरोक्त धान्य कुठून आणले जाते ? हा मुख्य कळीचा मुद्दा असून उत्पादनापेक्षा अधिकचे धान्य पुरविले जात असताना प्रशासकीय यंत्रणा गप्प का ? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.
अन्नधान्य साठविणे,वाहतूक करणे कायद्यांतर्गत शिल्लक धान्य साठा व ते कुठून आले या संदर्भात रीतसर माहिती व दफ्तर नोदणी अनिवार्य आहे.
मात्र प्रत्यक्षात जेवढे उत्पादन होत नाही,त्यापेक्षा अधिक धान्य जर साठविल्या जात असेल किंवा वाहतूक केल्या जात असेल तर या व्यवसायावर अंकुश लावून हा गोरखधंदा रोखण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेने करणे गरजेचे आहे.
मुळातच पिकविलेले गहू, तांदूळ प्रथम नागरिकांच्या खाण्यासाठी उपयोगात आणले जातात,जर ते धान्य अशा पद्धतीने संपविण्यात येत असेल तर जीवनावश्यक अन्न व वस्तू कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.
असे असताना प्रशासन गप्प का? अशा प्रकारांना आळा घालण्याचे अधिकार असूनही ते का कृतीत आणले जात नाही,याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
उत्पादन न करता राजरोसपणे एवढे धान्य वाहतूक व साठवण धर्माबाद येथील बाळापूर येथे केली जात असल्याने गोरगरिबांच्या धान्यावर तर डल्ला मारल्या जात नसेल ना ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जे व्यावसायिक उपरोक्त धान्य सदरील मद्यार्क निर्मिती करणाज्या कंपनीस पुरवठा करीत आहेत, त्यांना उपरोक्त धान्य पुरवठा केल्याची देयके नियमानुसार बँकिंग प्रणालीद्वारे देण्यात येतात.त्यामुळे ती देयके घेणाज्या संबंधितांची चौकशी केल्यास हे धान्य कुठून आणले जाते व किती प्रमाणात पुरविल्या जाते,याचा निर्वाळा होईल.
धर्माबाद शहरातील एका व्यावसायिकाने भ्रमणध्वनी बोलल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून वा तू व्यवसायात आता नांदेड येथील एका माजी आमदार पुत्राच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
त्यामुळे वे राजकीय पाठबळातून तर हे व्यवसाय चालत नाहीत ना ? अशी शंका व्यक्त केली जात आहे.