किनवट: भारतीय स्टेस्ट बँक शाखा किनवट येथे असलेली प्रचंड ग्राहक संख्या पाहता व्यापाऱ्यांना दैनंदिन व्यवहारात होत असलेल्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने एका नवीन डेडिकेटेड काउंटर चे उद्घाटन शहरातील प्रसिध्द व्यापारी राजेंद्र शंकरराव चाडावार यांच्या हस्ते
करण्यात आले. यामुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन व्यवहाराकरिता रोज ताटकळत बसावे लागणार नाही तर बँकेचं व्यवसाय ही वाढण्यात मदत होणार आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात बँकेचे प्रभारी व्यवस्थापक व अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.
अनुराग भस्मे शाखा प्रबंधक, अतुल गोदाजी बनसोडे शाखा प्रबंधक, गुलाबराव चव्हाण शाखा प्रबंधक ,दिलीप पंडितराव देशमुख शाखा उपप्रबंधक नितीन वानखेडे, सहाय्यक प्रबंधक, अरुण किशनराव माडपेल्लीवार सहायक प्रबंधक, हर्षद बाबाराव इंगळे सहाय्यक प्रबंधक, पंखुडी संजय शिंदे सहाय्यक प्रबंधक, राहुल वाळके सहाय्यक प्रबंधक इत्यादी उपस्थित होते