परभणी:-
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था व स्वयंदीप सोशल फाउंडेशन यांच्या विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई शतकोत्तर जयंती निमित्त एक दिवसीय महिला संविधान परिषद पुणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे नुकतीच पार पडली असून विवीध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा गौरव करण्यात आला. बार्टी चे महासंचालक आदरणिय धम्मज्योती गजभिये सर, स्वयंदीप च्या अध्यक्ष आदरणिय मानसी ताई वानखेडे रमाईताई सोनवणे, परिषदेच्या अध्यक्षा , भिक्कुनी गण , आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विवीध महिला व्याख्यात्यांचे विवीध विषयावर प्रबोधन झाले . परभणी येथील प्रसिद्ध साहित्यिका, महाकवियीत्री वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया होल्डर धम्मभूषण प्रा. ज्योती धुतमल पंडीत यांनी “बौद्ध कालीन स्त्रियांचा इतिहास आणि आधुनिक काळातील महिलांची भूमिका”स्पष्ट करताना प्राचीन काळी होऊन गेलेल्या क्रांतिकारी लढा देऊन जगात स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणाऱ्या सासू, सून,महान स्त्रिया यशोधरा व महाप्रजापती यांचा इतिहास कथन केला .स्त्रियांच्या मनोमनात क्रांतीचे बीज पेरणारी कार्यकर्ती आदर्श महिला ‘ रोहिणी ‘, भिक्कूनी धम्मधरा, यांचा क्रांतिकारी लढा स्पष्ट करताना त्यांचा आदर्श आधुनिक महिलांनी घेतला पाहिजे आणि कृतीयुक्त परिवर्तन वादी भूमिका पार पाडत स्वतः हुन ही धुरा सांभाळली पाहिजे. ज्या महान माता रमाई जयंती केवळ साजरी करून चालणार नाही , तर रमाईच्या त्याग स्मरण करून रमाईच्या काही सद्गुण का होईना आपल्या स्वतः मध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा हीच खरी जवाबदारी असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले.”महिलांच्या प्रचंड उपस्थितीत आणि उत्साहात यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिलांनी केले. प्रा. सुरेखा भालेराव पंढरपूर, प्रा. विद्या. राईकवार धुळे , अँडवोकेट मनिषा महाजन,प्रा. ज्योती धुतमल या प्रमुख वक्त्यांच्या प्रबोधनाने महिला मंत्रमुग्ध होऊन गेल्या त्याबद्दल महासंचालक आदरणिय धम्म ज्योती गजभिये व मानसी ताई वानखेडे यांनी सर्वांचे कौतुकास्पद अभिनंदन करून महिला परिषदेस सदिच्छा देत अंतरराष्ट्रीय महिला परिषदांचे आयोजन करण्याचे घोषित केले.
समाज परवर्तनाची धुरा महिलांनी स्वतःहून सांभाळावी. धम्मभूषण प्रा. ज्योती धुतमल पंडीत, परभणी यांचे प्रतिपादन.
38 Views