नांदेडचे क्रीडाक्षेत्रात नावलौकीक व्हावे..ज्ञानी अवतारसिंघ शीतल
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि. 4 मार्च : सचखंड नावाचे खूप महत्व असून क्रीडा क्षेत्रात देखील सचखंड चषक वॉलीबॉल स्पर्धेची भरभराट होऊन नांदेडचे नावलौकिक व्हावे असे प्रतिपादन गुरुद्वाराचे माजी पंजप्यारे साहिब ज्ञानी अवतारसिंघ शीतल यांनी शनिवारी सायंकाळी “सचखंड चषक 2023 वॉलीबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरदार नानकसिंघ घडीसाज,स. गुलाबसिंघ कांचवाले (बाबा सेठ), शिवाजी इबीतवार,लक्ष्मण पापुलवार,जाधव गुरूजी, इकबाल सर,कालूसेठ वापरानी, राजसिंघ रामगडिया,डॉ भीमसिंघ मुनीम, खेमसिंघ पुजारी, महेंद्रसिंघ लांगरी यांची उपस्थिती होती.
येथील खालसा हाईस्कूल मिनी स्टेडियम मैदानावर रणजीत स्पोर्ट्स अकैडमी नांदेड संस्थेतर्फे राष्ट्रीयस्तरावर सचखंड चषक 2023 वॉलीबाल स्पर्धेस दि. 4 आणि 5 मार्च रोजी खेलविण्यात येत आहे.या स्पर्धा गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड आणि गुरुद्वारा श्री लंगर साहेब यांच्या सहकार्याने घेण्यात येत आहेत.
संतबाबा कुलवंतसिंघजी, पंजप्यारे साहिबान आणि संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले यांच्या आशीर्वादाने दरवर्षी पार पडणाऱ्या या स्पर्धेचे ज्ञानी अवतारसिंघ शीतल यांनी कौतुक केले.हजुरसाहिब येथे होळी सणापूर्वी वॉलीबाल सारख्या लोकप्रिय खेळाचे सामने यशस्वी रित्या घेण्यात येत असून स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे असे ही त्यांनी आवर्जूनपणे सांगितले.
रणजीत स्पोर्ट्स अकैडमीचे सिमरजीतसिंघ बल,विक्रमसिंघ फौजी,सुरिंदरसिंघ उपल, गुरप्रीतसिंघ ग्रंथी,चरणजीतसिंघ, विशाल रुडे यांनी क्रीडा स्पर्धेचे संचालन केले.तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन इंदरजीतसिंघ सिलेदार यांनी केले.आजचा पहिला उद्धघाटन सामना रणजीत स्पोर्ट्स अकैडमी संघ आणि किवळा वॉलीबॉल संघ यांच्यात खेलविण्यात आला. स्पर्धेत जवळपास 25 संघांनी प्रवेश घेतला आहे.दोन दिवस रात्रंदिवस सामने रंगणार आहेत.अशी माहिती इंदरजीतसिंघ सिलेदार यांनी येथे दिली.
प्रथम पारितोषिक रु 21, 111/-
द्वितीय पारितोषिक रु 11, 111/-
तृतीय पारितोषिक रु 7, 777/-
बेस्ट शूटर,बेस्ट लिफ्टर, बेस्ट लिब्रो हे व्यक्तिक पारितोषिक
अशी माहिती रविंद्रसिंघ मोदी यांनी दिली आहे.