KINWATTODAYSNEWS

महावितरण उपविभाग किनवट येथे लाईनमन दिवस उत्साहात साजरा

किनवट -(आनंद भालेराव)
देशभरातील सर्व लाईंनस्टाफबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद शासनाने शनिवारी ०४ मार्च २०२३ रोजी देशभरात लाईनस्टाफ दिवस सर्व सार्वजनिक व खाजकी विद्युत क्षेत्रातील आस्थापना सूचना देण्यात आले होते. त्याअनुषंगाने आज दिनांक ०४ मार्च शनिवारी रोजी उपविभाग किनवट अंतर्गत किनवट शहर,ग्रामीण १ व २ तसेच मांडवी, सारखणी , बोधडी शाखेतील सर्व अभियंता व लाईन स्टाफ, बह्यात्रोत कामगार यांचा संयुक्तिक गुण गौरव व सत्कार चा कार्यक्रम संत श्री. गजानन महाराज मंदिर मंगलकार्यालय या ठिकाणी *”लाईनमन दिवस”* साजरा केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किनवट शहर शाखा सहाय्यक अभियंता श्री महेश भांगे साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री दिलीप राठोड ( सहाय्यक अभियंता- तुळजापूर) , सौ. संगीता बावणे मॅडम( सहाय्यक लेखापाल भोकर विभाग) यांनी उपस्थिती लावली होती. प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक अभियंता श्री. सुरेश गट्टूवार , सहाय्यक अभियंता श्री. सुमित दडमल , सहाय्यक अभियंता कू. प्रियांका तम्मडवार मॅडम तसेच बिलिंग सेक्शन सहाय्यक लेखापाल सौ. शोभाताई कनाके मॅडम, श्री व्यंकटराव ढगे, ओमप्रकाश शेंबाळे हे मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमास किनवट उपविभागातील सर्व लाईन स्टाफ व बाह्यस्त्रोत कर्मचारी प्रचंड संखेने उपस्थित होते.


यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सर्व लाईनस्टाफ जनमित्रांचे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी
अध्यक्ष श्री महेश भांगे साहेब हे जणमित्र म्हणजेच लाईनस्टाफ, लाईनमन हे महावितरणच्या व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे. मुळात तो महावितरण कंपनीचा कणा आहे व महावितरणचे जनमित्र हे ऊन, वारा,पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत देखील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा तासोंतास सेवा देतात. त्यांच्या या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे अश्या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दशरथ पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.राम भोंगाळे यांनी केले. सदर कार्यक्रम हा अतीशय उत्स्पूर्तपने व आनंदात साजरा झाला.

285 Views
बातमी शेअर करा