*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.4. जिल्यात वर्षभर ज्या कवी संमेलनाची रसिक आतुरतेने वाट पाहतात ते होळीनिमित्त सतत २१ व्या वर्षी होणारे महामुर्ख कविसंमेलन सोमवार दि.६.मार्च २०२३ रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत गंधर्वनगरी,कलामंदिर नांदेड येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती ॲड.दिलीप ठाकूर,संपादक डाॅ.जुगल धुत,जेष्ठ पत्रकार गोवर्धन बियाणी,नांदेड भूषण डाॅ.हंसराज वैद्य यांनी दिली आहे.
वाराणसी नंतर फक्त नांदेडमध्येच होळीच्या कविसंमेलनाचे आयोजन होलिका उत्सव समिती, कलामंदिर ट्रस्ट व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल द्वारे करण्यात येते.
यामध्ये शृंगारिक कविता आणि द्विअर्थी विनोदाची रेलचेल असते.प्रतिष्ठित व्यापारी अक्षय रावत यांच्या हस्ते कविसंमेलनाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीप कंदकुर्ते हे राहणार आहेत.विशेष अतिथी म्हणून भाजपा दिव्यांग आघाडी प्रदेश संयोजक रामदास पाटील सुमठाणकर आणि प्रसिद्ध उद्योजक अखिलेश गुप्ता हे उपस्थित राहणार आहेत.भाजप जिल्हाध्यक्ष प्रवीण साले,विरोधी पक्षनेता दीपकसिंह रावत,भाजप उद्योग आघाडी उपाध्यक्ष शिवप्रसाद राठी,नांदेड भूषण राजेंद्र हुरणे,गुरुद्वारा बोर्ड सचिव रविंद्रसिंघ बुंगई,भाजपा शीख सेल जिल्हाध्यक्ष कृपालसिंघ हुजूरिया,प्रतिष्ठित व्यापारी शिवाजीराव इबितवार,प्रतिष्ठित व्यापारी सुमित चौहान,प्रतिष्ठित व्यापारी नागेश शेट्टी,प्रतिष्ठित व्यापारी सतीश सुगनचंदजी शर्मा,प्रसिद्ध उद्योजक सन्नी गोयल,भाजप जिल्हा चिटणीस मनोज यादव,सामाजिक कार्यकर्ते बिरबल यादव,प्रतिष्ठित व्यापारी सुमेर राजपुरोहित,जैन समाज जिल्हाध्यक्ष राजू जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
आगळ्यावेगळ्या या कवी संमेलनात उत्तर प्रदेश येथील प्रा. ओमपाल निडर,सफर जौनपुरी,हास्यसम्राट सिध्दार्थ खिल्लारे,शाहीर रमेश गिरी,चला हवा येऊ दे फेम सतीश कासेवाड,प्रा.रविंद्र अंबेकर,पत्रकार राजेंद्र शर्मा,रेश्माजी हिंगोले,सिनेस्टार लच्छु देशमुख,बजरंग पारीख,वैजनाथ जाधव,राजेंद्र उपाध्याय,सुरेश बामलवा,अविनाश मामीलवाड,पी.बिंदू नाईक,विलास जोगदंड हे आपल्या प्रतिभेने रसिकांचा वर्षभरातील हसण्याचा कोटा पूर्ण करणार आहेत.
कार्यक्रम निशुल्क असला तरी १६ वर्षावरील पुरुषांनाच प्रवेश मिळणार आहे.गेल्या पंधरा दिवसापासून गंधर्व नगरीच्या मैदानाची स्वच्छता करण्यात येत असून जागा मर्यादित असल्यामुळे रसिकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.