KINWATTODAYSNEWS

23 जून रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचेना प्रमाणे किमान वेतन आशांना 18000 रूपये व गट प्रवर्तक ताईंना 22000 रूपये लागू करावेत व इतर मागण्या घेऊन जिल्हा परिषद नांदेड समोर एक दिवशीय धरणे/निदर्शने /थाळीनाद आंदोलन

नांदेड /प्रतिनिधी: दिनांक 23 जून 2021 रोजी आशा व गट प्रवर्तक ताईंना शासकीय सेवेत कायम करा व मा.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचेना प्रमाणे किमान वेतन आशांना 18000 रूपये व गट प्रवर्तक ताईंना 22000 रूपये लागू करावेत व इतर जीवनमरणाच्या मागण्या घेऊन जिल्हा परिषद नांदेड समोर एक दिवशीय धरणे / निदर्शने / थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तक ताईंनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन फेडरेशनच्या अध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार व सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले आहे.
या राज्यव्यापी आंदोलनास अंगणवाडी फेडरेशनचा राज्यव्यापी पाठिंबा असून अंगणवाठडी फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्ष मा.शततारका पांढरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.तसेच नांदेड दक्षिणचे विद्यमान आमदार मा.मोहन आण्णा हंबर्डे,जि.प.सदस्या प्रणितीताई देवरे यांनी देखील आशांच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात या साठी निवेदने दिले आहेत.
त्यांचे सीटू संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

156 Views
बातमी शेअर करा