KINWATTODAYSNEWS

कुसुम महोत्सवाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न..अभिनेते वैभव मांगले

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.१.कुसुम महोत्सवाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न इतरांसाठी प्रेरणादाई ठरेल असा विश्वास सुप्रसिद्ध अभिनेतेन वैभव मांगले यांनी व्यक्त केला आहे.

देशाचे माजी गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या सहचारिणी कै.सौ.कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दि. 1 ते 3 मार्च दरम्यान येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या कुसुम महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी सुप्रसिद्ध अभिनेतेन वैभव मांगले यांच्या हस्ते झाले.

यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत ,माजी आ. सौ.अमिताताई चव्हाण,माजी मंत्री डी. पी. सावंत, कु.श्रीजया अशोकराव चव्हाण,कु.सुजया अशोकराव चव्हाण,जिल्हा काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ.मिनलताई खतगांवकर,माजी महापौर मंगलाताई निमकर, मृणालताई अमरनाथ राजूरकर,माजी नगरसेविका ड्रा.करुणा जमदाडे,मंगलाताई धुळेकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना अभिनेतेन वैभव मांगले म्हणाले की,महिला व मुली सक्षम व्हाव्यात यासाठी शिक्षण, प्रशिक्षण तसेच लघु उद्योग करणार्या महिलांना प्रोत्साहन व व्यासपीठ उपलब्द करून देणे गरजेचे आहे.

कुसुम महोत्सवातून महिलांसाठी उपलब्ध करुन दिलेले व्यासपीठ आशादायक व विश्वासक असल्याचेही गौरोद्गार अभिनेते वैभव मांगले यांनी काढले आहे.

याप्रसंगी सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत म्हणाल्या की, कुसूम महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवाणी तसेच खाद्यपदार्थांसह लघु उद्योग करणार्या महिलांचे विविध स्टॉल व वस्तुंचे प्रदर्शन याचा भरभरून लाभ घेत महिला सक्षमीकरणासाठी सर्वानी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

यावेळी संयोजिका माजी आ. सौ.अमिताताई चव्हाण यांनी कुसुम महोत्सवाच्या आयोजनाचा उद्धेश स्पष्ट करत महिला सशक्त व सक्षमीकरणासाठी आयोजित केलेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

आभार प्रदर्शनात कु.श्रीजया चव्हाण यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात योगदान देतानाच महिलांच्या सक्षमीकरणांसाठी प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या आई माजी आ. सौ.अमिताताई चव्हाण यांचे विशेष आभार मानत कुसुम महोत्सवाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वच टीमचे आभार मानले कुसुम महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास महिला ,युवती व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

64 Views
बातमी शेअर करा