नांदेड:- दि. २८
अर्धापुर शहरातील बसस्थानक परिसरातील बरकतपुर भागातील दोन कुटुंबात रवीवारी, दि. २६ च्या रात्री नऊच्या सुमारास तुफान हाणामारी झाली व जिवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
हा भांडणाच्या वादात तलवार , खंजीर आदी धारदार शस्त्राने मारण्याचा प्रयत्न केला गेला.
फिर्यादी फकरुला मेहबुब खान व्यवसाय( हॉटेल मध्ये काम करणे ) यांच्या फिर्याद वरून
या प्रकरणी अर्धापुर पोलीस स्टेशन येथे चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गु. र. न.५६/२०२३ कलम ३०७,३२४,५०४,५०६,३४ भारतीय दंड संहिता नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
अर्धापुर येथील बरकतपुर भागात रवीवारी रात्री ९ च्या सुमारास शेख आवेश, शेख सोहेल, शेख आयान, शेख अदनान या चौघांनी संगनमत करून फकरुल्ला खान आणि त्यांचा पुतण्या आवेश खान यांच्या सोबत जुन्याच भांडणाच्या कारणावरून बाचाबाची सुरू केली या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले .
यात वरील चौघांनी फकरूल्ला खान आणि आवेश खान या दोघांना तलवार व खंजीराने पोटात आणि डोक्यात गंभीर दुखापत केली .
अशी तक्रार अर्धापुर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
या प्रकरणी फकरुल्ला खान यांच्या फिर्यादीवरून शेख आवेश ,शेख सोहेल, शेख आयान , शेख अदनान या चौघां विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा अधीक तपास पोलिस उपनिरीक्षक साईनाथ सुरवसे हे करीत आहेत.
अर्धापुर येथे जुण्या भांडणाच्या कारणावरुन खुनाचा प्रयत्न चौघा विरुध्द गुन्ह्यांची नोंद
107 Views