KINWATTODAYSNEWS

विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या विविध मागण्यासाठी बहुजन युथ पँथरचे निवेदन .मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन करण्याच्या तयारीत

नांदेड:-गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी स्वाधार योजनेपासून वंचित आहेत. त्यांना शिक्षण घेणे घेणे अवघड होत आहे. तसेच विविध मागण्यासाठी, गरीब, होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे वंचित राहू शकतात करिता आपण विषयावर तात्काळ कारवाई करून विद्यार्थ्याना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी बहुजन युथ पँथरचे जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे यांनी नुकतेच समाज कल्याण आयुक्त यांना लेखी निवेदन दिले आहे.
त्यांचें म्हणणें आहे की विद्यार्थी सध्या महागाई मुळे व विविध आर्थिक संकटाशी सामना करत आहे व शिक्षण घेत आहे परंतु या आर्थिक स्थितीचा सामना तो मागास असल्याने करू शकत नाही म्हणून समाज कल्याण विभागाने त्यांची समस्या समजुन घेऊन ती तात्काळ दुर करावी

मागण्या पुढीलप्रममाणे :

१) स्वाधार ची रक्कम तात्काळ विद्यार्थ्याच्या खात्यात जमा करा.

२) सर्व विद्द्यार्थ्याना सरसकट स्वाधार योजनेचा लाभ देण्यात यावा.

३) २०२३ स्वाधार योजनेतीलमधील जाचक अटी रद्द करावी.

४) बार्टी ची शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करणे.

५) रमाई घरकुल आवास योजना चा निधी ५ लाख करावा.

६) महामंडळ च्या योजना केवळ बेरोजगारांसाठी राबवाव्यात.

७) बार्टी प्रकल्प कार्यालय नांदेड, येथील झालेल्या अपहारची चौकशी करा.

८) महामंडळ कर्ज प्रकरणाच्या जाचक अटी रद्द करावी.

९) करण्यात यावी.

१०) विद्यार्थ्याची भारत सरकार शिष्यवृत्ती महागाई निर्देशांक नुसार वाढवण्यात यावी.

अन्यथा वरील सर्व मागण्यांसाठी विद्यार्थ्याना व नागरीकांना घेवून आपल्या कार्यालयासमोर दिनांक………०३-०३-२०२३ रोजी तीव्र धरणे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

63 Views
बातमी शेअर करा