KINWATTODAYSNEWS

मंदार नाईक (डीवायएसपी) यांनी परधान  समाज कर्मचारी बांधवांने केलेल्या गरजूंना मदत चे कौतुक करत कार्यालयात बोलावून केला सत्कार.

किनवट(आनंद भालेराव):
किनवट चे उपविभागीय पोलीस आधिकारी मंदार नाईक यांनी परधान  समाज कर्मचारी बांधवांने केलेल्या गरजूंना मदत चे कौतुक करत कार्यालयात बोलावून सत्कार केला.

किनवट तालुक्यातील परधान  समाज कर्मचारी बांधवांच्या वतीने गरजूंना मदत केलेली बातमी समजताच .किनवट चे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांना समजली, राबवलेला उपक्रम खुप आवडला,त्यांनी सर्व टीम ला कार्यालयात बोलावून कौतुक करून सत्कार केला.

त्यांनी परधान समाजाच्या कर्मचाऱ्यांनी भेटी दिलेल्या गावांचा उल्लेख करत म्हणाले की,अन्न दान करणे खुप पुण्याच काम आहे.त्याच बरोबर गावांतील तरुणांना आपण
रोजगार कसा उपलब्ध करून देऊ शकतो. तरुण वर्गाच्या हाताला काम कस मिळेल. या विषयी आपण माझ्या टीमच्या व तुमच्या टीमच्या सहकार्याने एक करिअर गाईडन्स हा उपक्रम गावांत राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.
कारण नोकऱ्या मिळन आज तेवढ सोप राहीलेल नाही. एखाद्या व्यक्तीच्या सुप्त गुणांना ओळखून पुढे त्याला त्यात करिअर कस करता येईल. या विषयी मार्गदर्शन करुया.अशे ऐक नाही शंभर छोटे मोठे कोर्स आहेत पण त्याबद्दल त्यांना माहिती सांगून त्यांना मार्ग दाखवुया.तुमच्या समाज कार्यासोबतच करिअर मार्गदर्शन
हा उपक्रम तुम्ही राबवा असेही मंदार नाईकाने सांगितले .तुम्ही कार्यक्रम आयोजित करा मला सुध्दा बोलावतात तर मी पण येईन
अस आश्वासनन ही साहेबांनी भेटी दरम्यान परधान समाज कर्मचारी बांधवाना दिले.
या प्रसंगी अध्यक्ष सुभाष कन्नाके , कार्य अध्यक्ष गोपाल कन्नाके , उपाध्यक्ष रामदास मेश्राम , सचिव मूरहारी कन्नाके , कोषाध्यक्ष शोभा कुमरे , गणेश डोंगरे , प्रसिद्धी प्रमुख प्रणय कोवे ,  सदस्य रमेश परचाके  , कैलास पंधरे, शशांक
कन्नाके ,संतोष पोहूरकर ,सौरब कनाके आदी सर्व उपस्थितीत होते

218 Views
बातमी शेअर करा