किनवट /प्रतिनिधी :अध्यावत शासन निर्णय ,न्यायालयाचे आदेश परिपत्रके या सर्व बाजूंच्या अवलोकन करून उपोषणार्थींना उपोषणापासून परावर्तन करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी किनवट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैष्णवांना आदेश दिले आहेत. गट विकास अधिकाऱ्यांनीही उपोषण स्थळी भेट देऊन चाचणी करून ग्रामसेवकांना निर्देशित केले.परंतु आज 25 फेब्रुवारी सहावा(6) वा दिवस असून अध्याप तरी मार्ग काढण्यास प्रशासनाला यश मिळेल नसल्याचे दिसत आहे. के के गार्डनच्या मुद्द्यावरून पाचव्या दिवशीही मार्ग निघालेला नाही रस्त्यावरील बसवलेली लोखंडी गेट काढून रस्ता खुला करावा ही साधी मागणी सोडू शकले नाहीत. परवानगी दरम्यान घालून दिलेल्या अटी शर्तीचे गार्डन व्यवस्थापकाने पालन केले नसल्यासही कार्यवाही का होत नाही? जोपर्यंत न्याय मागण्या मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलक त्यांच्या मुद्यावर ठाम असल्याचे दिसून येते.
केके गार्डन संबंधातील उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच
280 Views