KINWATTODAYSNEWS

आंबेडकरी चळवळीतील दिवंगत दत्ता सोनकांबळे यांचे दुःखद निधन,पुण्यानुमोदन तथा जलदान विधी कार्यक्रमाचे दि.२६ रविवारी आयोजन.

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.24. जिल्यातील मुखेड तालुक्या मधील मौजे बेटमोगरा येथील आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य सामाजिक कार्यातील नव युवकांचे मार्गदर्शक,स्वाभिमान भारत न्युज चे संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा सचिव निर्भीड पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांचे वडील दिवंगत दत्ता गंगाराम सोनकांबळे ( मुगावकर) यांचे दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई येथील के.ई.एम.रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.आयु.दत्ता गंगाराम सोनकांबळे यांचा जन्म सन १९५७ मध्ये नांदेड जिल्ह्यातील नायगांव तालुक्यातील मुगाव या गावी झाला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पत्नीसह पाच मुले यांचा सांभाळ करीत आपल्या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करुन दिली. त्यांना माहिती होत की शिक्षणाशिवाय आपली सामजिक,आथिर्क स्थिती मजबूत होणार नाही त्यामूळे आपली मुले शिक्षण शिकले पाहिजे असे त्यांना वाटायचे,आपला संसार सांभाळत सामाजिक कार्यातील कृतीला समर्थन व साथ दिली. त्यांना माहीत होते की,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी इतके काही केले आहे की त्याची परतफेड आपल्या लाखों पिढ्या करू शकत नाही पण निदान त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालावे व आंबेडकरी चळवळीत काम करून जे शक्य आहे ते नेक काम करावे असा मानस दिवंगत दत्ता गंगाराम सोनकांबळे यांचा होता व तो त्यांनी शेवटपर्यंत ठेवला तसेच त्यांनी आपल्या मुलांना प्रामुख्याने प्रकाश सोनकांबळे,भगवान सोनकांबळे,सह निर्भीड पत्रकार तथा संपादक भारत सोनकांबळे यांनाही तशीच शिकवणूक दिली त्यांच्यावर तसे संस्कार केले.
दिवंगत दत्ता सोनकांबळे यांनी आपला संसार सांभाळत असताना मुलांच्या शिक्षणाला खूप महत्व दिले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार दिवंगत दत्ता सोनकांबळे यांच्या डोक्यात होता व याच विचारांनी त्यांनी आपली मुले उच्च शिक्षित केली.

त्यांचा सर्वात लहान मुलगा निर्भीड पत्रकार तथा संपादक आयु.भारत सोनकांबळे हे सामाजिक कार्यासह पत्रकारिता क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करतात व ते कायद्याचे चांगले अभ्यासक आहेत.

पत्रकार भारत सोनकांबळे हे गेली १० वर्षांपासून मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे त्यांच्या मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने विवीध स्वरुपाचे सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवितात. सर्वच महापुरुषांचे जयंत्या महापरिनिर्वाण दिन साजरे करतात.दिवंगत दत्ता सोनकांबळे हे
घर,कुटुंब,नातेवाईक, व चळवळीतील इतर लोकांशी ते अत्यंत विनम्र पणे बोलत असे… कुणाच्याही सुखदुःखात ते तातडीने मदत करीत व ते स्वतः त्या ठिकाणी सहभागी राहत असे. दिवंगत दत्ता सोनकांबळे हे अत्यंत शांत,सुसंस्कारित आणि लढाऊ होते.

सुरुवातीपासूनच लोकांशी कसं बोलायचं कसं वागायचं हे त्यांना चांगलं माहीत होतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना अत्यंत चांगलं सूसंस्कृत संस्कार दिले.दिवंगत दत्ता सोनकांबळे यांनी कुटुंबाचा सांभाळ करीत असताना त्यांचं सामाजिक चळवळीमध्ये मोठे योगदान आहे.

ते मध्यांतरीच्या काळात ते घरेलु स्वतःचीच पॅसेंजर गाडी (मॅक्स जिप) चालवायचे.मात्र दि.६ फेब्रुवारी २०३३ रोजी बेटमोगरा येथील बसस्थानक येथील हॉटेलात चहा पिण्यास जात असतानाच अचानक त्यांना मेंदूचा लकवा मारल्याने ते बेशुद्ध पडले दरम्यान त्यांच्यावर बेटमोगरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारांसाठी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना तेथुन पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथेही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून न आल्याने त्यांना नांदेडहुन मुंबई येथील के.ई.एम.रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे पाच दिवसाच्या उपचारात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच उपचारादरम्यान दि.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ९:०० वाजता त्यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या अकाली निधनाने सोनकांबळे कुटुंबाची च नाही तर आंबेडकरी समाजाची मोठी हानी झाली आहे.

दिवंगत दत्ता सोनकांबळे यांच्यापाठी पत्नी सागरबाई दत्ता सोनकांबळे, पाच सूना,पाच मुले ज्ञानेश्वर,प्रकाश,गौतम,भगवान,भारत(पत्रकार),भाऊ,भावजय,पुतण्या,नातू,नाती व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

दिवंगत दत्ता गंगाराम सोनकांबळे यांचा पुण्यानुमोदन तथा जलदान विधी कार्यक्रम रविवार दि.२६/२/२०२३ रोजी सायं:४.३० वाजताराहते घर मौजे बेटमोगरा ता.मुखेड जि.नांदेड येथे संपन्न होणार असून आपण सर्वांनी या पुण्यानुमोदन कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती पत्रकार भारत सोनकांबळे व सोनकांबळे परिवाराने केली आहे.

128 Views
बातमी शेअर करा