*कोरपना/प्रतिनिधी
निमनी 19/02/23 कोरपना तालुक्यातील निमणी येथे ग्रामपंचायत निमणी व अर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शिवजयंती महोत्सव तथा शिवजयंती निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी शिबिराचे उद्घाटन डॉ. कुलभूषण मोरे यानी केले तर अध्यक्ष अतुल धोटे (सरपंच ) प्रमुख अतिथी शिल्पा जगताप (उपसरपंच) डॉ. प्रदीप मंडल( हृदयरोग तज्ञ) डॉ. नंदिनी मोरे (संचालिका अर्थ फाउंडेशन) उमेश राजूरकर (माजी उपसरपंच) देवगडे (सी एच ओ) पडवेकर सिस्टर , भालचंद्र कोंगरे (मुख्याध्यापक ) ,अशोक झाडे , बांदुरकर , आत्राम सदस्य शालेय व्यवस्थापन समिती तसेच आयोजक साहिल धोटे , रितेश धोटे , वैभव , सैनिक दुर्गे आशा वर्कर नागरिक महिला शालेय विद्यार्थी उपस्थित होते….. या शिबिरात बालक महिला नागरिक अश्या 200 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली त्याच प्रमाने डॉ कुलभूषण मोरे यानी आरोग्य स्वछता पोषण आहार या विषयावर आरोग्य बद्दल मार्गदर्शन केले . सूत्र सचालन उमेश राजुरकर तसेच आभार प्रदर्शन साहिल धोटे यानी केले .
शिवजयंती निमित्य भव्य आरोग्य शिबिर संपन्न* अर्थ फाउंडेशन आणि निमनी ग्रामपंचायत चा संयुक्त स्तुत्य उपक्रम ..!
151 Views