किनवट/प्रतिनिधी : शासनाने मंजूर केलेल्या किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा लवकरात लवकर बसवा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल या आशयाचे निवेदन किनवट मुख्याधिकारी यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन कदम पाटील श्रीकांत बेद्रे प्रदीप कोल्हे आकाश इंगोले शुभम हसबे ओम काकडे पुंडलिक सोरटे विशाल पिनमवार चंद्रशेखर गरड रामकिशन गरड अमोल हेळगे आदींच्या साक्षऱ्या आहेत.
198 Views