*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.19.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून “हात से हात जोडो” या अभियानाला सुरुवात झाली.भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर या “हात से हात जोडो” अभियानाला अतिशय महत्त्वपूर्ण अभियान म्हणून काँग्रेस पक्षाने राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. नांदेड जिल्हा व नांदेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर तालुक्यातील भोकर उपनगरात या अभियानाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
संविधान आणि देशाच्या एकजुटीसाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने नांदेड जिल्हात राज्याच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.रेखाताई चव्हाण यांनी व प्रदेश वरिष्ठ सचिव अनिता इंगोले यांच्या सहकार्याने व प्रदेशाध्यक्ष संध्याताई सवालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले पुतळा परिसरात शहरातील व जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींसाठी पाणी व बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदरील उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी चव्हाण बोलताना म्हणाले की,या देशात खोटे देऊन केंद्रात भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई, बेरोजगारी, जातीधर्मात तेढ आणि अराजकता वाढली आहे.
सरकारी कंपन्या विकणे, उद्योगपतींचे कर्जे माफ करणे, मनुवादी विचार रुजविणे, स्वातंत्र्य, हिरावून घेणे, पत्रकारांवर माध्यमांवर दबाव, नोटबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या GST मुळे छोटे उद्योग बंद पड़त आहेत. अश्या प्रकारचे भाजपचे कारभार सुरु आहे. या विरुद्ध आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे,
संसदेत विरोधकांचे माईक बंद केले जात आहे. म्हणून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोड़ण्यासाठी, सत्य लोकांपुढे मांडण्यासाठी राहुलजी गांधीनी “भारत जोडो यात्रा” सुरु केली आणि त्यांस देशात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आत्ता भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यात आहे.
या “भारत जोडो” यात्रेचा संदेश, नऊ वर्षाचा मोदी सरकारचा अपयशी कारभार, त्यांच्यावरिल आरोपपत्र प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी, संविधान आणि देश वाचविण्यासाठी “हात से हात जोडो अभियान” सुरु केले आहे त्यासाठी अतिशय चांगले नियोजन केले आहे. राहुलजी गांधी व प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली “हात से हात जोडो” यात्रा चांगल्या प्रकारे यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला.
पुढे म्हणाले की, ७ नोव्हेम्बर पासून मा.राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरु झाली असून महागाई, बेरोजगारी, देशामध्ये वाढत असलेला हिंसाचार,जातीधर्मात वाढत असलेला तेढ़ या सगळ्या गोष्टिना वाचा फोड़ण्यासाठी “भारत जोडो” यात्रेनंतर यात्रेचा संदेश,मोदी सरकारचे नऊ वर्षाचा जुलमी कारभार तसेच समतेचा, बंधुतेचा, प्रेमाचा संदेश प्रत्येक घरोघरी पोहोचविण्यासाठी मा.सोनियाजी गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नेतृत्वाखाली प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता या अभियाना अंतर्गत प्रत्येक घरोघरी पोहोचवनार आहे.
“डरो मत” म्हणून हे राहुल गांधीनी सांगितले सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे तो अधिकार बजावण्यासाठी, लोकांना सत्य सांगण्यासाठी, सरकारला जाब विचारण्यासाठी म्हणून हे “हात से हात जोडो” अभियानाअंतर्गत देशातील जनता भाजपा सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत.
यावेळी सदरील उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी.पी. सावंत,आमदार मोहन अण्णा हंबर्डे, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर,जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,मनपाच्या माजी महापौर मंगलताई निमकर, जयश्री पावडे,युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे,वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा मीनल खतगावकर,मंगल धुळेकर,छाया कळस्कर,संगीता डक,जेसिका शिंदे,नसीम पठाण,प्रणिता भरणे, प्रज्ञा झंपलवाड,अरुणा पुरी,अनिता सूर्यवंशी,शिवनंदा देशमुख,मंजुषा पाटील, सीमा वाघमारे,रितिका गोराजे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश पाटील सोडेगावकर,शंकर सूर्यवंशी,शिवराज पाटील, संभाराजे कदम यांनी मेहनत घेतली तर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. रेखा पाटील चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.