नांदेड: सतराव्या शतकामध्ये सेवालाल महाराज यांनी गोरगरीब जनतेला अंधश्रध्देतून बाहेर काढण्याचे काम केले. ‘जाणजो छाणजो, पचज माणजो’ या वाक्यातून त्याची चिकित्सक वृत्ती दिसून येते. इंग्रजांविरुध्द उठाव, अन्याय अत्याचार विरुध्द लढा, ‘कोयी केती नानो मोठो छेई’ या वाक्यातून सामाजिक एकोपा आपल्याला पहायाला मिळतो. ‘अनुभवेती सीक जको खरो’ माणूस अनुभवातूनच घडत असतो. सर्व समाज घटकाना एकत्र आणण्याचे काम सद्गुरु सेवालाल महाराज यांनी केले..!
सेवालाल महाराजांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली व सर्व शासकीय कार्यालयात व सर्वत्र सेवालाल महाराज यांची 15 फेब्रुवारीला जयंती साजरी केली जाते. त्यांच्या कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेला जयंतीच्या निमित्ताने करावी यानिमित्ताने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे, दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी. समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी मा. प्रकाश खपले साहेब आणि समितीचे सदस्य तथा उपायुक्त मा. अनिल शेंदारकर साहेब यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली..!
यावेळी,
श्रीमती सुनीता शिंदे मॅडम ( पोलीस निरीक्षक ), मुकुंद मुळे, सिद्राम रणभीरकर, विठ्ठल आडे, बालाजी शिरगिरे, संजय पाटील, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, बाबू कांबळे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होणवडजकर, सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे यांची उपस्थिती होती..!
– सोनू दरेगावकर, नांदेड..!
दिनांक : 15 फेब्रुवारी 2023