KINWATTODAYSNEWS

मुंबई येथे होणाऱ्या जवाब दो आंदोलनास उपस्थित राहण्याचे आव्हान – बाळुभाऊ लोंढे

प्रतिनिधी:- दि. १७ फेब्रुवारी रोजी २०२३ क्रांतीपिता विर वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी घरोघरी लहुवंदना व लहुगीत घेऊन अभिवादन करावे. क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य त्यांनी देशासाठी केलेली क्रांती त्यांचे विचार शिक्षणाची चळवळ आपल्या मुलां-मुलींना कळवा व दि. २२ तारखेला मुंबई येथे होणाऱ्या महाराष्ट्र सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो आंदोलन मध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्या समाजाच्या राजकीय, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहिलच पाहिजे. असे जाहिर अहवान मातंग युवा जोडो अभियान महाराष्ट्र समिती चे प्रमुख बाळुभाऊ लोंढे यांनी महाराष्ट्रातील सर्वच समाजबांधव व माता भगिनींना केलं आहे,

70 Views
बातमी शेअर करा