जळगांव : दि 12/02/2023 ला जळगाव (खानदेश )येथे लहुजी ब्रिगेड च्या राज्य कार्यकारिणी ची बैठक पार पडली. त्यावेळी अनेक नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. तसेच संघटनेच्या पुढील कामकाजाबाबतचे निर्णय घेण्यात आले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री डॉ अंकुश गोतावळे तसेच श्री तात्यासाहेब सोनोने हे उपस्थित होते. सोबतच संघटनेचे प्रमुख पदाधिकारी श्री. सुरेशजी अंभोरे साहेब, सौं आशाताई अंभोरे, श्री विनोदभाऊ कांबळे, श्री भगवान सपकाळ, श्री सुनिलभाऊ उमप,श्री अंबादास गोतावळे, श्री देवानंद अवचिते,सौं रेखाताई कांबळे,सौं सविताताई भालके, सौं मनीषाताई झुंजारे,सौं वैशालीताई लोखंडे,श्री शेरखान भाई,श्री जमील शेख,सौं नफिसा शेख, श्री संतोष निकाळजे, श्री महल्ले, श्री मिसाळ तसेच इतर अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये आझाद मैदान मुंबई येथे दि 22/2/23 रोजी सकल मातंग समाज आयोजित आंदोलनामध्ये संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी म्हणून सक्रिय सहभाग नोंदविण्याबाबत ठराव घेण्यात आला.राज्य कार्यकारिणी च्या बैठकीचे आयोजन प्रदेशाध्यक्ष श्री विनोदभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.
लहुजी ब्रिगेड च्या राज्य कार्यकारिणी ची बैठक जळगाव येथे संपन्न
147 Views