KINWATTODAYSNEWS

सात लाख रुपयेची फसवणूक केल्या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपींना अटक.

किनवट/प्रतिनिधी: आरोग्य खात्यात नोकरी लावून देतो म्हणून आमिष दाखवून व खोटे नियुक्तीपत्र देऊन सात लाख रुपयेची फसवणूक केली प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटकही करण्यात किनवट पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर असे की फिर्यादी सचिन मोहन जाधव वय 34 वर्ष राहणार गंगा नगर तालुका किनवट यांनी दिनांक 6 12 2022 रोजी पोलीस स्टेशन किनवट येथे दिलेल्या तक्रारीवरून आनंदराव रामजी सोनकांबळे व्यवसाय सेवानिवृत्त वनपाल,राहुल आनंदराव सोनकांबळे व्यवसाय बेरोजगार दोघेही रा. सिंगरवाडी हल्ली मुक्काम लेक्चर कॉलनी गोकुंदा,सुरेश प्रकाश डोंगरे राहणार शिरपूर तालुका महागाव जिल्हा यवतमाळ व इतर यांचे विरुद्ध किनवट पोलीस स्टेशन येथे गु रजिस्टर नंबर 238 /22 भादवि कलम 420,468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सदर गुन्ह्यातील वरील तीनही आरोपीना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहेत. यांनी किनवट तालुक्यामध्ये आरोग्य सेवक पदाची नोकरी लावण्याचे अमिष दाखवून बऱ्याच बेरोजगार तरुणांना फसविले असल्याची माहिती मिळाली असून त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास वेगाने चालू आहे. वरील आरोपींना दिनांक 6.2. 23 रोजी व दिनांक 7.2. 23 रोजी अटक करण्यात आली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी मध्ये आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नांदेड, मा. अप्पर पोलीस अधीक्षक भोकर ,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बोरसे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस कॉन्स्टेबल कागणे ,पठाण यांनी केली आहे

983 Views
बातमी शेअर करा