KINWATTODAYSNEWS

युवकांनी भविष्याचे चिंतन करत असतांना ध्येय प्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.कष्टानेच ध्येय प्राप्ती होते असे प्रतिपादन -पोलीस निरीक्षक दीपक बोरसे

किनवट/प्रतिनिधी: राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव तयार होते. युवकांनी भविष्याचे चिंतन करत असतांना ध्येय प्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.कष्टानेच ध्येय प्राप्ती होते असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले दि 7 फेब्रुवारी रोजी मौजे दिगडी-मंगाबोडी सरस्वती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक शिबिरा समारोप करताना बोलत होते सरस्वती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते सरपंच सौ नलिनी अविनाश किनाके, संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार, सहसचिव देवराव गोणेवार, राजू मुंडे केशव केंद्रे, देविदास पेंदोर यावेळी मंचावर उपस्थित होते
वर्तमान काळ मोठ्या स्पर्धेचा आहे जोरदार प्रयत्न करावे लागतील हे आपण स्वतःच तपासले पाहिजे हातात आलेल्या मोबाईलचा दुरुपयोग न करता सकारात्मक जीवन प्रवासासाठी करावा छेडखानी करणाऱ्यांनी कायद्याची भीती बाळगावी, मुलींनी न घाबरता आपल्याला होणारा त्रास आपले परिवार जन किंवा आप्तेष्ट यांना कळवावा असे आवाहन पोलीस निरीक्षक बोरसे यांनी शेवटी युवक-युवतींना केले. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कु राजश्री उर्वते हिने स्वागत गीत गायले.प्राथमिक शाळेच्या विदयार्थिनींनी आदिवासी नृत्य सादर केले.अध्यक्षीय समारोप करताना श्री सातूरवार म्हणाले आदिवासी समाजाने मुलींना उच्च शिक्षण द्यावे त्याचा लाभभविष्यात नक्कीच त्यांना मिळेल प्रास्ताविक प्राचार्य डॉ आनंद भंडारे यांनी केले महाविद्यालय भान जपून समाजाच्या सेवेचा वसा जपतेसमाज सेवेचे अनेक उपक्रम महाविद्यालय राबविते असे सांगितले शिबिरार्थी सौरभ नैताम याने मनोगत व्यक्त केले डॉ मनोहर थोरात यांनी अहवाल वाचन केले,यावेळी लोक कलाकार केशव केंद्रे, हिरामण जाधव, वादक गायकवाड यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रो मार्तंड कुलकर्णी, प्रा द्वारकाप्रसाद वायाळ, डॉ सुनील व्यवहारे, प्रा तपनकुमार मिश्रा,प्रा विवेक चनमनवार,कार्यक्रम अधिकारी डॉ रामकिसन चाटे, पोलीस विभागाचे पोलीस विभागाचे प्रकाश बोदमवाड, शिवा अनंतवार, आनंद भालेराव,विश्वम्भर मुसळे,मधुकर ताडपेल्लीवार,गोविंद ताडपेल्लीवार गावकरी शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ किरण आयनेनिवार यांनी व आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा अजय किटे यांनी केले.

55 Views
बातमी शेअर करा