*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.8. जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्या मधील लहान येथील निसर्गरम्य माळटेकडीवर कालवश दलीत मित्र निवृत्तीराव लोणे ह्यांचा अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या तपोवन बुद्ध भूमीत आज धम्म परिषदेतील प्रथम सत्राचा धम्म ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला आज ठीक 10.30 ला पूज्य भदंत सत्यानंद महाथेरो,पूज्य भदंत नागेसन बोधी,पूज्य भदंत सुभोती,पूज्य भदंत नागा त्रिपटक यू. पी.,पूज्य भदंत धम्मबोधी पानगाव ,आधी भिखु संघाच्या हस्ते धम्म ध्वजारोहण पार पडले,त्याचं बरोबर विविध गावातील प्रतिनिधी उपस्थितीत होते.
लहान येथील सरपंच,उपसरपंच,चनापुर येथील सरपंच उपसरपंच लोन येथील सरपंच उपसरपंच,त्याचं बरोबर बोरगाव आणि पंचक्रोशीत आदी गावातील मान्यवर उपस्थिती होते.आज संध्याकाळी ४ वाजता लोणी (खुर्द) भीमज्योती बूध्द वीहारापासून कालवश निवृत्तीराव लोणे यांच्या चैत्यस्मारकाचे पूजन करून भिक्खू संघाच्या उपस्थितीत भव्य धम्ममिरवणूक काढण्यात येईल सोबत श्री.देऊबाई शाळच्या लेझिम पथक आणि समता सैनिक दलासह धम्म मिरवणूक निघणार आहे.
संध्याकाळी परिषदेला पूज्य भदंत धम्मसेवक महास्थिवर(मुळावा) पूज्य भदंत आनंद महस्थविर (अध्यक्ष आग्रा दिल्ली),पूज्य भदंत खेमधम्मो मुळावा,पूज्य भदंत सत्यानंद थेरो(बुध्दगया),पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी विपश्र्नाचार्य(मुंबई), पूज्य भदंत पयाबोधी थेरो (खुरगाव नांदेड),पूज्य भदंत पय्यारत्न थेरो,(नांदेड)पूज्यभदंत सुभोती थेरो(तपोवन लहान), पूज्य भदंत नागशेनबोधी लातूर, पूज्यभदंत शिलरत्न नांदेड,पूज्यभदंत रेवत बोधी नांदेड,पूज्यभदंत धम्मबोधी आणि या सह देश विदेशातील आदी भीखुसंघ धम्म देसनेसाठी उपस्थित राहणार आहेत.
आज ७ वाजता माजी.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन होणार असून यावेळी महाउपासक डॉ.एस.पी. गायकवाड,माजी आमदार अमिताभाभी अशोकराव चव्हाण आधी विविध क्षेत्रातील मान्यवर ह्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आज आणि उद्या रात्री विविध गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
या मधे गायक मनोजराजा गोसावी- नागपूर,दिपाली कांबळे लातूर,माधव वाढवे -हदगाव, दिनकर लोणकर – हिंगोली, भारती राऊत-परभणी, बबन दिपके वसमत,राजेश भारती3 नांदेड,दिलीपराजा परघणे-नेवरी, बापूराव जमदाडे-शिराढोण, अशोक चवरे आदींचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
या धम्म परिषदेला नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पस्थित राहावे असे आवाहन आयोजिका अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे, संयोजक संजय लोणे, स्वागताध्यक्ष संजय देशमुख लहानकर यांनी केले आहे.