श्रीक्षेञ माहुर –
माहुर तालुक्यातील लामनखोरी (तुळशी), जुनापानी-लसनवाडी, पानोळा तसेच किनवट तालुक्यातील सारखणी व रायपूर तांडा या प्रस्तावित सिंचन तलावांचा तात्काळ मंजूरी द्यावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य जोतिबा खराटे यांनी मा.ना.मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्या कडे केली आहे. याशिवाय पाचुंदा राम मंदिरालगतचा २५ एकर जागेवरील राम तलाव थातूरमातूर दुरूस्ती न करता संपूर्ण गाळ काढल्यास तेथे नौका नयन, कमळ फुले व्यवसाय अस्तित्वात येणार असल्याने पर्यटन विकास अंतर्गत तो तलाव येत्या वर्षात संपूर्णपणे गाळ काढुन घेतल्यास या परीसरातील पर्यटन व्यवसाय तसेच हजारो एकर जमिनी सिंचनाखाली येणार असल्याने पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांना पण खराटेंनी विशेष निवेदन दिले असल्याने येत्या जि. प. निवडणूकीत दादा वाई-वानोळा-उमरी या तीन थड्यावर हात ठेऊन असले तरी दस्तुरखुद्द जोतिबा खराटे यांनी आजतरी याविषयी बोलणे टाळले आहे.
जि. प., पं.स. ची निवडणूक ६ महिण्यांवर येऊन ठेपली असून वाई गट अनुसूचित जमातीसाठी राखीव होण्याची दाट शक्यता असल्याने वाई गटातील अनेक मातब्बर नेते वानोळ्याकडे वळल्यास नवल वाटायचे कारण नाही. गत निवडणुकीत केवळ ३५० मतांनी पराभूत झालेल्या जोतिबा खराटे यांनी पराभवानंतरही खचून न जाता माहुर तिर्थक्षेत्र विकास, वाझरा व आष्टा पर्यटन विकास, शेतकर्यांची कर्जमाफी, मनरेगा मधील भ्रष्टाचार, इत्यादी प्रश्नावर शासन दरबारी लढा चालूच ठेवला होता. त्यांचे वडील स्व. जयरामजी खराटे व सुविद्य पत्नी सौ. विमलताई खराटे यांनी २५ वर्षे जि. प. सदस्य म्हणून रंजल्या गांजल्यांना न्याय मिळवून दिले होते त्यामुळेच त्यांचा हा नवीन जल क्रांती लढा शिवसेना साम्राज्यात कितपत यशस्वी होतो याकडे माहुर व किनवट तालुक्यातील जनता चातक पक्षाप्रमाने लक्ष ठेवून आहे.