*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.3.जिल्यातील सर्वच तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे.शहरासह गावागावात खुलेआम मटका,दारू,गुटख्या, रेती, मुरूमची शासनाचा महसूल बुडून विनापरवाना विक्री होत आहे.
तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर असणाऱ्या ढाब्यांतूनही बेकायदेशीरपणे दारूची विक्री होत आहे.मात्र सर्वच प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असून,दिवसेंदिवस अवैध धंदे वाढ होतं असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे तालुक्यात भरमसाट बेकायदा धंदे सुरू असल्याचे दिसून येत होते.
मात्र वर्षभरापासून तालुक्यात पुन्हा एकदा बेकायदा धंदेवाल्यांनी तोंड वर काढले आहे.जिल्यातील शहरा शहरात व ग्रामीण भागात सुद्धा बेकायदेशिर धंदे दिवसेंदिवस जोमाने सुरु असल्याचे चित्र आहे.
जिल्यातील सर्वच शहरातील व ग्रामीण भागात काही टपऱ्यांवर खुलेआमपणे दारूची व पेट्रोलची विक्री होत आहे.या ठिकाणी मटका,ऑनलाईन
जुगार बिनधास्त चालू आहेत.शहरा बाहेरील रस्त्या रस्त्यावर धाब्यावर देशी विदेशी दारू,बियर विनापरवाना विक्री सुरू असताना सोबत मटका,जुगार,गुटखा या धंद्यांनी सुद्धा जोर धरला आहे.तसेच जिल्याच्या चौका चौकात मोठया प्रमाणात खुलेआम मटका चालतो. इतर ठिकाणी असलेल्या ढाब्यांवर देखील खुलेआम पणे बेकायदा दारूची विक्री होत आहे.
गावा गावात बेकायदा दारू विक्रेत्यांनी ही चांगलेच बस्तान बसवल्याचेही चित्र आहे.
बेकायदा दारू विक्रीबरोबरच गुटखा,पेट्रोलचीही बेकायदेशीरपणे विक्री होत आहे. अनेक गावांत काही पानटपऱ्या,दुकानांतून पेट्रोल, किराणा दुकानातून गुटख्याची खुलेआमपणे विक्री केली जात आहे.बेकायदेशीरपणे होणाऱ्या दारू,पेट्रोल आणि गुटख्याच्या विक्रीचे दरही बेकायदेशीर आहेत. दीडपट ते दुप्पट दराने याची खुलेआमपणे विक्री होत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीर धंदे खुलेआमपणे सुरु असताना कारवाई झाल्याचे चित्र कोठेचे दिसून येत नाही.संबंधित गावची बेकायदा धंद्यांची माहिती असून देखील सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागात अवैद्य धंद्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.अशा धंदेवाल्यांवर कोणाचीच जरब नसल्याने चित्र आहे.
एकूणच या साऱ्या प्रकारामुळे अवैध व्यवसाय जोमात असल्याचे दिसत आहे.यामुळे गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. याला लगाम घातला जावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
त्यामुळे अवैध धंद्यांना लगाम घालणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.