जिवती/प्रतिनिधी: येल्लापुर केंद्रस्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा 1व 2 फेब्रू 2023 ला स्व.भा.चटप आश्रम शाळा गुडशेला येथे घेण्यात आल्या. या स्पर्धमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केकेझरी शाळेने घवघवीत यश संपादन केलं. *माध्यमिक मुले कब्बडी (प्रथम) माध्यमिक मुले खो – खो (प्रथम) माध्यमिक मुली खो – खो (प्रथम) माध्यमिक मुली (द्वितीय) प्राथमिक मुले खो – खो (प्रथम) प्राथमिक मुली खो – खो (प्रथम) तसेच सांस्कृतिक स्पर्धेत फॅन्सी ड्रेस (प्रथम) व सामूहिक नृत्य – (द्वितीय)* अश्या प्रकारे अव्वल येऊन प्रथमच केकेझरी शाळेला केंद्रस्तरीय चॅम्पियन बनण्याचा मान मिळाला. हे यश जिवती तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. भागवत रेजीवाड साहेब, मा. सुनील झोडे साहेब विस्तार अधिकारी जिवती, मा. धनपाल फटिग साहेब विस्तार अधिकारी, मा. अण्णाराव आडे सर विस्तार अधिकारी टेकामांडवा, मा शेंडे सर केंद्रप्रमुख येल्लापुर यांच्या प्रेरणेने व मा. तोडे मॅडम मुख्याध्यापक, श्री. भालेराव सर, श्री. वभिटकर सर, श्री. गावंडे सर यांच्या मेहनतीने त्याच प्रमाणे शा. व्य. समितीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने मिळाले आहे
शालेय बालक्रिडा स्पर्धेत केकेझरी शाळा प्रथमच चॅम्पियन
114 Views