किनवट/प्रतिनिधी: औरंगाबाद शिक्षक मतदार संघात आमदार विक्रम काळे यांच्यासह राज्यात महाविकास आघाडीचे एकूण 3 आमदार विधान परिषदेत निवडून आल्याचा जल्लोष किनवट येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिजामाता चौकात केला.
यावेळी उपस्थित संघटनेचे अरविंद राठोड माजी नगराध्यक्ष के मूर्ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील, वैजनाथ करपुडे पाटील,राहुल नाईक, कचरू जोशी, विनायक गव्हाणे ,अमरदीप कदम तर शिवसेनेचे संतोष यलचलवार ,प्रमोद केंद्रे, प्रवीण रेड्डी तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी बामणे, अमोल जाधव, मनोज श्रीरामे यांच्यासह तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
393 Views