KINWATTODAYSNEWS

लोकप्रतिनीधी करताहेत जनतेची दिशाभुल मुक्रमाबाद परिसर विकासापासुन कोसो दुर* *भाजपाची एकहाती सत्ता असुनही विकास होईना

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.31. जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मुक्रमाबाद, देगलूर व उदगीर महामार्गावर रावी ते मारवाडी फाट्यापर्यंत खड्डेच खड्डे असून केंद्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे विकासाला खीळ बसली आहे.

गल्ली ते दिल्ली पर्यंत एनडीए सरकारची सत्ता असताना देखिल देगलूर व उदगीर महामार्गावर मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बूजऊन उलट रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

देगलूर ते उदगीर महामार्गावर मुखेड तालुक्याच्या हद्दीतील रावी ते मारजवाडी फाटा रस्त्याची दुरवस्था झाली आहे.गेल्या तीन वर्षांपासून रस्ता रखडल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.राजकीय अनास्थेमुळे प्रशासनाचेही त्यांच्या पुर्ततेकडे दुर्लक्ष केले असल्याचे नागरीकातून व्यक्त केले जात आहे.या रस्त्याला मंजुरी मिळून दोन वर्षे पूर्ण झाली आहे.

पण या रस्त्याच्या कामासाठी कोणीही शासन दरबारी ठाम भूमिका बोलुन दाखवली नाही.यामुळेच आमदार,खासदारांच्या मध्ये समन्व्यचा अभाव असल्याने हा रस्ता राजकीय परीस्थितीच्या विळख्यात अडकल्याने हा रस्ता आजही रखडला आहे.गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याला मंजुरी मिळाली असे म्हणतात.पण प्रत्यक्षात रस्त्याचे काम केव्हा होणार असे म्हणून नागरीकांत संभ्रम निर्माण होत आहे.पूर्वी हा रस्ता राजमार्ग होता पण गेल्या ४ ते ५ वर्षांपूर्वी राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बूजवून उलट संबंधित विभाग नाहक त्रास देत आहे. पांदन रस्त्यासारखा महामार्गावर मुरुम टाकला आहे.मुक्रमाबाद बसथानक येथे धुळीने
नागरीक त्रस्त झाले आहेत.

पावसाळ्यात चिखल आणि आता धूळ होत आहे.खासदार, आमदार हे लोकप्रतिनिधी डोळ्यांवर पट्टी बांधून धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहेत. मरजवाडी फाटा ते रावी
पर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती हॉटमिक्स पध्दतीने करावी अशी मागणी होत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून नूतनीकरण करण्यात आले नाही.फक्त खड्डे बुजविण्याचे काम संबंधित विभाग करीत आहे.

60 Views
बातमी शेअर करा