KINWATTODAYSNEWS

ग्रामीण भागातील नागरिकांना सोयीसुविधा पूरवा.आ.भीमराव केराम

श्रीक्षेञ माहूर –

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेली ताळेबंदी शिथिल करण्यात आली आहे.त्यामुळे माहूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणा-या समस्या दूर करण्यासाठी त्यांना सोयी सुविधा पूरवा अशा सूचना आ.भीमराव केराम यांनी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांना दि.१८ जून रोजी दिलेल्या पत्रातून दिल्या आहेत.

माहूर तालुक्याच्या ग्रामीण भागात निर्माण झालेल्या समस्या बाबत समाज माध्यमांतून व भ्रमणध्वनीवरून असंख्य तक्रारी प्राप्त होत आहेत.त्या दूर करण्यासाठी महामार्ग रस्ता निर्माण मार्गावरील नविन पुल बांधकामा जवळील रस्ता वाहतुकी योग्य करा, वाहतुकीस बांधा येत असलेल्या ठिकाणची दुरुस्ती करा, दुरसंचार विभागासह , बी.एस.एन.एल , आयडीया, वोडाफोन , इत्यादी नेटवर्क ( जाळे )सुरळीत करा, प्रा.आ.केंद्र व उपकेंद्रातून सामान्य नागरिकांना प्राथमिक उपचार सेवा दिल्या खेरीज पुढील उपचारांसाठी पाठवू नका, शाळा, महाविद्यालये प्रदिर्घ काळानंतर सुरु होत असल्याने विद्यार्थासाठी रहिवासी व उत्पन्न प्रमाणपत्र एक खिडकी योजने अंतर्गत तात्काळ वाटप करा ,तलाठ्या मार्फत स्थळपाहणी करुन पिक पे-याची नोंद घेवून आवश्यक प्रमाणपत्र शेतकऱ्यांना उपलब्ध होईल अशी उपाय योजना करा, तांत्रीक अडचणी दूर करून ग्रामीण भागात अखंडीत विज पुरवठा करा, मोफत बस प्रवास पासेस स्थानिक प्रवेशित शाळेतच विद्यार्थ्याना उपलब्ध करून द्या, प्रशासक/ ग्रामसेवकांना दररोज उपस्थित राहून विद्यार्थी / नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे व इत्तर योजनाची सेवा ग्रामपंचायत मध्येच देण्याच्या सूचना करा, वारसा आधारे प्रलंबीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीच्या फेरफार नोंदी घ्या, संजय गांधी निराधार योजनेचे अर्थ सहाय्य नियमीतपणे वाटप करा आदि सूचना आ.भीमराव केराम यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रातून केल्या आहेत.

113 Views
बातमी शेअर करा