किनवट/प्रतिनिधी: स्वच्छ आस्थापना स्पर्धेत किनवट शहरातील माहेर हॉस्पिटल ने पहिला क्रमांक पटकाविला नगरपरिषद किनवट च्या वतीने स्वच्छ किनवट सुंदर किनवट 2023 या मोहिमेत अंतर्गत शाळा महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी ही स्पर्धा होती. नगर पालिकेच्या प्रशासक डॉक्टर मृणाल जाधव यांच्या हस्ते ते उत्तेजनार्थ दि. 26 जानेवारी रोजी प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ किनवट सुंदर किनवट 2023 या सदराखाली स्वच्छते विषयक स्पर्धा संपन्न झाल्या उल्लेखनीय म्हणजे शाळा महाविद्यालय आणि रुग्णालयाचा या मोहिमेत अंतर्भाव केला होता. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे स्वच्छतेचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. यातून जणजागृती निर्माण होऊ शकते. किनवट नगर परिषदेच्या प्रशासक तथा तहसीलदार जाधव यांनी हा महत्वपूर्ण उपक्रम राबविला हे विशेष. या नाविन्यपूर्ण उपक्रमात किनवट शहरातील शिवाजी नगरातील माहेर हॉस्पिटल चा स्वच्छतेच्या निकषातून पहिला क्रमांक आल्याने प्रशासक डॉक्टर मृणाल जाधव आणि स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांच्या स्वाक्षऱ्यांच्या प्रशस्तीपत्रकासह सन्मानचिन्ह देऊन डॉक्टर अनिल राठोड व सौ. राठोड यांचा नगरपालिका कार्यालयात गौरव करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यकआनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार, गटनेते जाहिरोद्दीन खान, नगरसेवक इमरान खान ,अभय महाजन यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
स्वच्छ आस्थापना स्पर्धेत किनवट शहरातील माहेर हॉस्पिटल ने पहिला क्रमांक पटकाविला मृणाल जाधव यांच्या हस्ते गौरव.
153 Views