नागपूरः लहू सेने चे प्रमुख संजय कठाळे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी श्रीमती बनकर मॕडम यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.
ZEE ( D.J.Karam Rimix ) वरती काले धंदे ( Kale Dhande ) या नावाने एक वेबेसिरीज करण्यात आलेली आहे . या वेबसिरीज मध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि निर्माते यांनी एका लग्न समारंभात मध्ये काही बँड वाले आत मध्ये मंडपात AC च्या समोर हवा खात उभे असलेले दाखविण्यात आलेले आहे. त्याच वेळी समोरून महेश मांजरेकर व सहकारी येतात जाता जाता मागे वळून उभारलेल्या बँड वाल्यांना महेश मांजरेकर म्हणतात की, अरे तुम्ही लोक इथे काय श्राध्दाचं जेवण करायला आले का रे …….समोरचे बँड वाले ही काही डायलाॕक बोलतात , तर लगेच महेश मांजरेकर म्हणतात अरे वाजवायला आले तर वाजवा ना मधी का आले ……तुमच्या लय गां******आलीना ……तुमच्या गां******ट्राम्पेट घालून हवा फुकीन ….चला बाहेर चलायचं आणि मस्त वाजवायचं ……अशा अपमानास्पद वआश्लील भाषेत बँडवाल्यां सोबत हा प्रसंग चिञीत केला गेला आहे. खरं तर वेबसिरिज रिलीज करणं ही जरी प्रायव्हेट आनं बेलगाम घोड्यासारखी बाब असली तरी ही आशा प्रकार चे चिञीकरण करणं म्हणजे बँड व्यवसाय करुन आपली व आपल्या परिवाराची उपजिविका भागवणाय्रा सर्व सामान्य गोर-गरिब लोकांच्या तो एक प्रकारे अपमानच आहे.बॕड व्यवसाय हा काही तुच्छ व्यवसाय नसून कोणत्याही मंगलप्रसंगी आपण सर्व जणच बँडवाल्यांना वाज विणालाय्रांना बोलावून आपल्या मंगल कार्याची शोभावाढतअसतो. परंतु या ” काले धंदे ” वेबसिरीज मधील हा प्रसंग पाहतांना सहजपणे लक्षात येते की , एक घमेंडी, मुजोर , जातीवाती मानसिकतेचा बदमाश, उच्च -निच असा भेदभाव मानणाऱ्या मग्रृर माणूस हा मंगल कार्यालयात वाद्य वाजवण्यासाठी आलेल्या सर्व सामान्य गोरगरिब लोकांना कशा पध्दतीने नीच , बँड वाली माणसं म्हणजे हलक्या प्रतिचीआनं कसलाच स्वाभिमान नसलेली प्रतारणेस पाञ असल्या सारखीच आहेत. असे दाखवण्याचा मोठा प्रयत्न वेबसिरीज मधून करतो, हे या प्रसंगातुनप्रकर्षाने जानवत आहे.
अशा प्रकारच्या समाजामध्ये तेढे निर्माण करणाऱ्या सर्व सामान्य लोकांना अपमानित करणाऱ्या , लज्जास्पद वाटणाऱ्या , उच्च-निचतेचा किळसवाणा भेदभाव पसरवाणाय्रा, बँड कलावंताचा अपमान करणाऱ्या वेबसिरीज वर बंदी आणून , अशा प्रकारच्या वेबसिरीज निर्माण करणाऱ्या निर्माते व अभिनेते , दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात मानवी मुल्यांची अवहेलनाकरणे , माणवी मुल्यांची पायदळी तुडवणे, लोकांचा स्वाभिमान नाकारणे, ही माणसे खालची दर्जाची आहे .आशा संदेश जनमानसात पोचविणे उच्च -निचता या भेदभावाला खत पाणी घालने.अश्या प्रकारचे कृत्ये केल्या मुळे त्यांच्या वर गुन्हे दाखल करा,
या प्रकारचे निवेदन लहू सेने ने नागपूर जिल्हाधिकारी मा.श्रीमती बनकर मॕडम यांच्या मार्फत देण्यात आले. महेश मांजरेकर यांचा तिव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
शिष्टमंडळात सर्व श्री…प्रकाश ऊकूंडे , हेमंत गायकवाड , अशोक खडसे , महेन्द प्रधान , रविन्र्द खडसे , गणेश साळवे , मुरलीधर रणखांम , दिपक गायकवाड , दिलीप गायकवाड , दिवाकर खंडाळे , पद् माकर बावने , अंकित चन्ने , बादल रोकडे , अजय रोकडे ईत्यादि उपस्थित होते .
मानवी मुल्यांची अवहेलना करुन पायदळी तुडविणाय्रा महेश मांजरेकरांवर गुन्हे दाखल करा…..जिल्हा अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
47 Views