किनवट (तालुका प्रतिनिधी) : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थाच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांतर्गत लोककल्याण हेतुने पोलीस स्टेशन किनवटला चार बॅरिकेटचे वितरण केले. वितरण उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हासंघचालक संतोष तिरमनवार, पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक ओद्दीवार हे उपस्थित होते.
यावेळी जनकल्याण नागरिक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध केंद्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे रोप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण म्हणून सामाजिक कार्यात संस्थेच्या वतीने साठेनगर व गंगानगर येथे वृक्षारोपण करून त्रिगार्ड लावले, कोरोना काळात अन्नधान्याची किट वाटप केली, आठवडी बाजारात पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली, किनवट शहरात महापूर आला त्यावेळी पूरग्रस्तांना भोजनाची व्यवस्था केली, छोट्या व्यावसायिकांना ऊन व पावसापासून बचाव करण्या साठी मोठ्या छत्रीचे वाटप केले, आदिवासी मुलांचे वनवासी कल्याण आश्रमाला देखील मदत केली जाते, शिशुवाटीकेला सुद्धा मदत केली. त्याचबरोबर २६ जानेवारी च्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या शाळांना, संस्थेच्या शाळांना व शहरातील शासकीय कार्यालय अशा सर्व ठिकाणी भारत मातेची प्रतिमा देऊन पूजन व्हावे या उद्देशाने प्रतिमा दिल्या. त्याचाच एक भाग म्हणून किनवट पोलीस स्टेशनला चार बैरिकेट देत आहोत. तर आगामी काळात व्याख्यानमालेचेही आयोजन करत समाज उपयोगी जे विषय असतील असे उपक्रम संस्थेच्या वतीने राबवले जातील. असे आपल्या प्रास्ताविकात ते म्हणाले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हासंघचालक संतोष तिरमनवार म्हणाले की, समाज उपयोगी जे काम असेल ते सर्व काम स्वयंसेवक करतीलच परंतु लहान व्यवसायिकांना हक्काची संस्था म्हणून कर्ज देते व त्याचप्रमाणे ते परतही करतात असे म्हणत संस्थेला शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक ओद्दीवार यांची समायोचीत भाषणे झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे म्हणाले की, ही पतसंस्था सामाजिक भान ठेवून गेली पंचवीस वर्षापासून अविरत काम करते व आपण दिलेल्या बॅरिगेट अत्यंत उपयोगी आहेत. त्यामुळे संस्थेचे आभार मानले यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव मच्छलावार, विहिप प्रचार व प्रसार प्रसिद्धी प्रमुख किरण ठाकरे, देवगिरी कल्याण आश्रमचे अध्यक्ष डॉ. उत्तम धुमाळे, कल्याण आश्रमचे प्रकाश टारपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वाठोरे, मिथुन सावंत, राष्ट्र सेविका समितीच्या संयोजिका सौ. अंजली राठोड, पतसंस्थेच्या संचालिका डॉ. अनुराधा उपासनी, संचालक रोहित चाडावार, राजू कट्टावार, शुभम कोकलवार, व्यवस्थापक सुरेश पवार, प्रवीण सातुरवर, संजय ताटीकुंडलवार, गजानन शिरपुरे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तर पतसंस्थेचे सचिव प्रा.प्रकाश उत्तरवार यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थाच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांतर्गत लोककल्याण हेतुने पोलीस स्टेशन किनवटला चार बॅरिकेटचे वितरण
194 Views