KINWATTODAYSNEWS

सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक, विद्यालय किनवट येथे भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

किनवट:दि. (२७ जाने. २०२३) सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक, विद्यालय किनवट येथे भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीताताई राठोड मॅडम यांच्या हस्ते झाले. ‘आनंद नगरी ‘ या कार्यक्रमाचे उद्घाटन वि. ज. शि. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. प्रा.श्री. इंद्रसिंगजी राठोड साहेब यांच्या सुविज्ञ पत्नी श्रीमती बेबीताई राठोड यांच्या हस्ते करण्यात आले,या कार्यक्रमाप्रसंगी सौ. स्वातीताई राठोड मॅडम व मान्यवर महिला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधानाचे वाचन करुन विमुक्त जन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड श्री सचिन राठोड साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थिनींनी विविध देशभक्ती गीत व नृत्य,डंबेल्स,लेझिम,घुंगुरकाठी यांची प्रात्यक्षीके सादर केली.भारतीय एकात्मतेचा संदेश विविध राज्यातील वेशभूषा सादर करुण देण्यात आला.उपजिल्हाधिकारी कार्यालय,किनवट येथे श्री निलेश भिलवडीकर व श्रीमती सपना मंडारे यांनी मार्गदर्शन केलेल्या योगासन व मनोरे या नृत्याविष्कारासाठी मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक देण्यात आले व शालेय स्तरावर संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री सचिन राठोड साहेब यांच्या हस्ते विविध राज्यातील वेशभूषा नृत्य सादरीकरणाला पारितोषिक देण्यात आले.

कु. स्वानंदी राठोड, राजनंदिनी केन्द्रे, माहेश्वरी गिरी,पुनम आगीमेलीवार, शांभवी जोशी,राजकन्या केंद्रे, वेदिका राठोड,भुमिका राठोड, वैष्णवी जाधव, वसुंधरा चव्हाण,रुचा पवार,मैथली जाधव, आरती जाधव,मानवी पवार,अंजली भोजणे,प्रणाली कांबळे, जीवीका फुलझले,अनुष्का परेकार,स्नेहा एलचलवार,अनुजा पडीले,वैशाली एलपुलवार,अपुर्वा मुनगीलवार,वेदिका आडे,स्नेहा मेहनतकर,तनिष्का हापसे,प्राची जाधव,वंशीका बोड्डेवार,प्रतिक्षा कुंदलवाड,समिक्षा कुंदलवाड या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित कार्यक्रमाकरिता श्री चव्हाण सर,श्री निकम सर,श्री उप्पे सर, श्री राठोड सर,श्री भिलवडीकर सर, श्रीमती तोरणेकर मॅडम, श्रीमती देवराव मॅडम,श्रीमती माजळकर मॅडम,श्रीमती रीठे मॅडम,श्रीमती सपना मंडारे टिचर,श्रीमती किर्ती वाढवे टिचर तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्विपणे पार पाडण्यास परीश्रम घेतले.

293 Views
बातमी शेअर करा