KINWATTODAYSNEWS

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले कदम कुटुंबियांचे सांत्वन

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.28.शहरातील तरोडा (बु) भागातील माजी ग्रामपंचायत सदस्या तथा मनपा माजी नगरसेविका गंगाबाई नारायणराव कदम यांचे कर्करोगाच्या आजाराने नुकतेच निधन झाले असून दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मंगेश कदम यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून शोक व्यक्त केल्यानंतर प्रत्यक्ष कदम यांच्या घरी जाऊन् सांत्वन केले.

काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांच्या मातोश्री माजी नगरसेविका गंगाबाई नारायणराव कदम यांचे नुकतेच निधन झाले असल्याने त्यांच्या महसूल नगर येथील निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सेवानिवृत नायब तहसीलदार नारायणरावं कदम,अँड,धम्मपाल कदम,बंटी कदम व कदम कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी आ.अमरनाथ राजूरकर,मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी,माजी उपमहापौर आनंद चव्हाण,सतीश देशमुख तरोडेकर,नगरसेवक प्रतिनिधी संतोष मुळे,विक्की वाघमारे, पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,प्रदीप कांबळे होनवडजकर विक्की गायकवाड,अरविंद सरपाते गौतम सोनकांबळे,संजय कांबळे संदीप कांबळे होनवडजकर,यांच्यासह मित्रमंडळी उपस्थित होते.

151 Views
बातमी शेअर करा