KINWATTODAYSNEWS

कनकी येथील हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी “देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम”संपन्न.

किनवट/ता.प्रतिनिधी: कनकी तालुका किनवट येथील हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी संध्याकाळी “देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम” आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांत रेड्डी कल्यामवार (तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी किनवट) हे होते. तर उद्घाटक म्हणून मांडवी पोलीस स्टेशनचे पीएसआय शिवरकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कणकीचे तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकटरेड्डी चिलकुलवार, उपसरपंच विनोद राठोड, मुख्याध्यापक पी व्ही साबापुरे, पवन चव्हाण कैलास राठोड उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवराच्या हस्ते सरस्वती देवी व स्वर्गवासी माधवराव रेड्डी कल्यामवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले. पीएसआय शिवरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना शिवरकर म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून कोरोना संक्रमण असल्यामुळे शाळा महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकले नव्हते परंतु आता यावर्षी खुल्या वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रम शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचा सर्वांनी शांततेत आनंद घ्यावा व आपल्या पाल्यांचे कौतुक करावे.
विद्यालयातर्फे आयोजित देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमात विविध देशभक्ती गीते नाट्यछटा, विविधतेत एकता म्हणून विविध भाषेतील गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य केले व विविध कलात्मक कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख दिनकर शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंद भालेराव यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पी. व्ही. साबापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक श्री इंगोले सर, तायडे सर, शेंडे सर, बी.के. राठोड, आनंद भालेराव, भगवान बोनतावार, राजेंद्र ठाकरे, विष्णू मडावी, पोचिराम मोहूर्ले, रामराव राठोड, नरसिंग खांडरे आदी ने परिश्रम घेतले.

165 Views
बातमी शेअर करा