किनवटः तालुका प्रतिनिधी ःशासन मान्य अन्न धान्य कोठार किनवट व इस्लापूर येथील कार्यरत हमाल बांधव यांनी त्यांचे हमालीचे अतिरिक्त काम भत्ता महागाई निर्देशांक रक्कम सन 2010 ते 2019 ही शासनाने हमाल बांधवांना वितरण करण्यासाठी आनंद हमाल कामगार संस्था इस्लापूर यांचे बँक खात्यात दोन कोटी 83 लाख 12 हजार 355 रुपये जमा केले परंतु आज पंर्यंत ही रक्कम कार्यरत हमाल बांधवांना वितरित करण्यात आली नाही त्या मुळे किनवट व इस्लापूर येथील हमाल 30 जानेवारी पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की किनवट या आदिवासी तालुक्यातील अन्न धान्य तहसील गोदामाचे किनवट इस्लापूर येथे धान्य गोदाम आहेत या गोदामातून तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना वाटप साठी मालाची उचल करतात या दोन्ही गोदामात कार्यरत हमाल बांधव हे नियमितपणे आपले कर्तव्य बजावतात परंतु यांना त्यांच्या कामाचा मावेजा हा इस्लापूर येथील आनंद हमाल कामगार संस्था इस्लापूर द्वारे होतो म्हणून शासनाने त्यांनी केलेल्या कामाचा मावेजा रक्कम ही वरील संस्था प्रमुखांनी बिल क्रमांक 135 दिनांक तीन आठ 2018 ला 150260 88 रुपये बिल क्रमांक 23 दिनांक 25 .4. 2018 ला 82768 रुपये बिल क्रमांक 16 ला 13 20 34 89 रुपये असे मा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड पुरवठा ने वरील रक्कम आनंद हमाल कामगार संस्था इस्लापूरचे बँक खात्यात जमा केली परंतु या संस्थेने अध्यक्ष सचिव कार्यकारी मंडळ सदस्य हे राजकीय असल्याने त्यांनी काम केलेल्या आम्हाला त्यांच्या मेहनतीचे महागाई निर्देशांक रक्कम अद्यापही वितरित गेली नाही. तेव्हा कामगारांची आर्थिक फसवणूक झाली म्हणून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी व काम बंद आंदोलन करण्याचा इशारा शेख इस्माईल शेख मदार शेख हुसेन शेख इस्माईल व इतर 16 हमारांनी दिला असून या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री अन्न पुरवठा मंञी
जिल्हाधिकारी नांदेड तहसीलदार किनवट यांना दिले..
हमालीचे अतिरिक्त काम भत्ता महागाई निर्देशांक रक्कम वितरित न केल्यामुळे किनवट व इस्लापूर येथील हमालांचा 30 जानेवारी पासून काम बंद आंदोलनाचा इशारा
66 Views