जिवती/प्रतिनिधी: शिक्षण विभाग पंचायत समिती जिवती तर्फे 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन गोंडवाना महाविद्यालय जिवती येथे करण्यात आले होते ।
शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयांतर्गत आमच्यासाठी गणित या उप विषयांमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा टेकामांडवा येथील विद्यार्थ्यांनी गणित विषयांतर्गत तयार केलेल्या मॉडेलचा तालुक्यातून उच्च प्राथमिक गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला। विशेष बाब म्हणजे सलग दुसऱ्यांदा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टेकामांडवा शाळेने प्रथम क्रमांक पटकावला। दिपक गोतावळे सर विज्ञान/ गणित विषय शिक्षक यांच्या मार्गदर्शनात कु हर्षल दत्ता सोलनकर व कु भाग्यश्री तातेराव बिंगेवाड इ 7 वी या विद्यार्थ्यांनी संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी ,गुणाकार, भागाकार इत्यादी क्रिया खेळणी स्वरूपातून कशा शिकवाव्या या बद्दलचा प्रकल्प तयार केला होता। तर श्री रुपेश मांदाळे यांनी शिक्षक गटातून गणित विषयांतर्गत सहभाग नोंदविला
। शाळेच्या या यशाबद्दल बीडिओ डॉ भागवत रेजीवाड साहेब, बीईओ झोडे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी फटिंग साहेब,आण्णाराव आडे साहेब, केंद्रप्रमुख किसन बावणे , मु अ लचु पवार शाळेतील शिक्षक वृंद दत्ता दोरे,उषा डोये,मुखळा मलेलवार, शा व्य समिती, पालक वृंद सर्वांनीच विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन करून कौतुक केले व पुढील जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या।
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जि प टेकामांडवा शाळा सलग दुसऱ्यांदा प्रथम
164 Views