किनवट ता.प्रतिनिधी:
मराठी भाषेचा भाषिक व्यवहार वाढणे गरजेचे असून वाचन लेखन व संवाद याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे असे मत सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालयात मराठी विभागा च्या वतीने दि.१८ जानेवारी रोजी पार पडलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे हे होते तर उद्घाटक म्हणून सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव तथा सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णकुमार नेमानीवार .. पत्रकार प्रमोद पोहरकर व बळीराम पाटील महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका ममता जोनपेल्लीवार आदी मान्यवर उपस्थित होते.. या पंधरवड्या निमित्त आयोजित सात दिवशीय कार्यक्रमाचे उद्घाटन याप्रसंगी पार पडले. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर कु. दिव्या मुंडे यांनी स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले मंचावरील सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते पार पडले यात कु. मीनाक्षी मडावी मनीषा जटाळे. प्रणिता मनमंदे.. बोकारे वैभव व कु. आरती लोंढे यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर मार्तंड कुलकर्णी यांनी केले या एकूणच कार्यक्रमाची भूमिका व महत्त्व त्यांनी आपल्या विवेचनातून स्पष्ट केली. दिनांक 18 ते 24 जानेवारी या सात दिवसांमध्ये मराठी शुद्धलेखन स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा निबंध लेखन स्पर्धा घोषवाक्य लेखन स्पर्धा तसेच विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. सरस्वती अध्यापक विद्यालयाचे मराठी विषयाचे प्रा. आनंद सरतापे यांनी याप्रसंगी आपले मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक ममता जोनपेलीवार यांनी भाषा व भाषिक संवाद या विषयाच्या अनुषंगाने आपले मत व्यक्त केले .आपल्या विवेचनातून दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी तथा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप वाकडीकर यांनी मराठी भाषेत अधिकाधिक वाचन होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा मोठ्या प्रमाणात उपयोग घ्यावा अशी भावना व्यक्त केली. आपल्या अध्यक्ष भाषणातून भाषा विषयाचे जेष्ठ अभ्यासक प्राचार्य आनंद भंडारे यांनी भाषा भाषिक व्यवहार व त्यामागील उपयोगिता याचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना अधिकाधिक भाषेचा वापर करण्याचे आवाहन केले. अखेर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मराठी विषयाचे सह अध्यापक सुमित चिंतकुंटलावार यांनी केले. या कार्यक्रमासाठी सरस्वती शिक्षण संस्थेच्या माध्यमिक उच्च माध्यमिक डीएड बीएड तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व सर्व सहकारी शिक्षक प्राध्यापक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रिडा सन्चालक डॉ विजय उपलन्चवार ,डॉ सुनील व्यवहारे प्रा.तपनकुमार मिश्रा. डॉ रामकिशन चाटे डा.आणासाहेब सोळंके.प्रा.विवेक चनमनवार प्रा.अजय किटे,डॉ किरण आयनेनिवार,माधव नेमानिवार व संजय संकनेनीवार आदिंनी परिश्रम घेतले.
मराठी भाषेचा भाषिक व्यवहार वाढणे गरजेचे असून वाचन लेखन व संवाद याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे- पत्रकार प्रदीप वाकोडीकर
159 Views