किनवट/प्रतिनिधी: किनवट शहरातून जाणारा मुख्य रस्ता समान रुंदीचा किंवा बायपास करण्यात यावा असे निवेदन सुरेश सोळंके पाटील माजी शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी किनवट यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिले आहे.
किनवट शहरातील मुख्य रस्ता अय्यप्पा स्वामी ते आंबेडकर चौक सध्या ८० फुटाचा आहे आता 100 फुटाचा करून नगरपरिषद मध्ये दोन्ही बाजूने नाली बांधकाम पूर्ण केले आहे. पुढे आमचे 50 वर्षापासून बांधलेले घरे आहेत.
आम्हाला कोणतीही नोटीस किंवा आमच्या जागेचा मोबदला( मावेजा) न देता सार्वजनिक बांधकाम आमचे घर पाडण्याच्या तयारीत आहेत. आयप्पा स्वामी ते आंबेडकर चौक 100 फूट आंबेडकर चौक ते अशोक स्तंभ 66 फूट आणि अशोक स्तंभ ते ठाकरे चौक 80 फूट असे वेगवेगळे प्रकारे मोजणी केल्याचे दिसून येत आहे. त्याकरिता मेहरबान साहेबांनी किनवट शहरातून जाणारा मुख्य रस्ता समान रुंदीचा किंवा बायपास करून द्यावा अशी विनंती निवेदनात द्वारे करण्यात आली आहे.
किनवट शहरातून जाणारा मुख्य रस्ता समान रुंदीचा किंवा बायपास करण्यात यावा. अशोकराव चव्हाण कडे सुरेश सोळंके चे निवेदन
195 Views