KINWATTODAYSNEWS

पाळीव प्राण्यांच्या मालकांनी त्यांच्याकडील पाळीव प्राणी मोकाट रस्त्यावर सोडू नये अन्यथा मोकाट जनावरे कोंडवाडा टाकून संबंधिता विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल -मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव

किनवट /तालुका प्रतिनिधी :
किनवट शहरात गेल्या अनेक वर्षापासून मोकाट प्राण्यांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे .
शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट गाढवे, मोकाट डुकरे, मोकाट घोडे, मोकाट कुत्रे व मोकाट जनावरे यांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे अनेक अपघातही झाली आहेत.

वेळोवेळी नगरपालिकेला अर्ज विनंती करूनही आजपर्यंत दखल घेतली गेली नव्हती. याविषयी “किनवट टुडे न्यूज” ने या विरोधी वेळोवेळी आवाज उठवला असता नुकत्याच नगरपालिकेच्या प्रशासक म्हणून विराजमान झालेल्या कर्तव्यदक्ष डॉक्टर मृणाल जाधव मॅडम यांनी तात्काळ पत्रक काढून मोकाट जनावरांच्या व प्राण्यांच्या मालकाविरुद्ध कार्यवाही करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
त्यामुळे नगरपालिकेचे कर्मचारी कितपत या मोकाट जनावरांच्या, प्राण्यांच्या मालका विरुद्ध कारवाई करतात याकडे सर्व किनवट शहरवासी यांचे लक्ष लागून आहे. असे झाल्यास किनवटचे रस्ते मोकळा श्वास घेतील असे जनतेतून बोलल्या जात आहे.

97 Views
बातमी शेअर करा