KINWATTODAYSNEWS

मौ.रिठ्ठा ग्रामपंचायतीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप…* *गटविकास अधिकारी राठोड व ग्रामसेवक एनलोड यांना निलंबित करण्याची मागणी…

नांदेड:-( प्रतिनिधी) राज्यभरात सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार डोके वर काढत आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. विना पैशाने एखादे काम वेळेवर झाले तर नवलच अशी स्थिती आज झाली आहे. जेव्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग एखादी रंगेहात केस पकडते त्या अगोदर कितीतरी अशी लाचेची प्रकरणे विना तक्रार पार पडलेली असतात. जनता आता अशा यंत्रणेला पूर्णपणे वैतागून गेली आहे. राज्यकर्ते किंवा प्रशासकीय अधिकारी वर्ग असो या भ्रष्टाचारी यंत्रणेबाबत काहीच बोलत नाहीत, आवाज उठवत नाहीत. कारण त्यांना अशा या सडक्या, किडक्या यंत्रणेची साथ मिळत असते. एखादा सामाजिक कार्यकर्ता यावर आवाज उठवण्याचे काम करीत असेल तर “तुझ्यावरच गुन्हा दाखल करीन” अशा शब्दात त्याला दमदाटी दिली जाते. त्या दमदाटीला न जुमानता नांदेड येथील सामाजिक कार्यकर्त्या शितल भवरे ने मौ.रिठ्ठा ता.भोकर जिल्हा नांदेड येथे भ्रष्टाचार झाल्या बाबतचे निवेदन दिनांक 09 जानेवारी 2023 रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना दिले आहे.
शितल भवरे यांनी निवेदनात असेही नमूद केले आहे की मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. माहिती अधिकारा अंतर्गत माहिती गोळा करून विविध भ्रष्टाचार उघड करण्याचा प्रयत्न मी नेहमीच करीत असते. त्याचप्रमाणे मौ. ग्रामपंचायत रिठ्ठा येथे ही 2022- 23 मध्ये एमआरजीएस अंतर्गत पेवर ब्लॉकच्या झालेल्या कामांमध्ये भोकर चे गट विकास अधिकारी अमित राठोड व ग्रामसेवक गंगा किशन एनलोड यांनी संगणमताने बोगस मजूर दाखवून तसेच खोटे जीएसटी बिले, खरेदी केलेल्या साहित्याची खोटी बिले वापरून थातूरमातूर कामे करून अमाप भ्रष्टाचार केलेला आहे. कारण अंदाजपत्रकानुसार कामे न करता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून कामे केलेले निदर्शनास येत आहे. त्यामुळे रिठ्ठा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करण्यात यावी व त्यांनी खोटे काम करून काढलेले कुशल व अकुशल बिलाची व संबंधित कागदपत्राची चौकशी करून तात्काळ भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे. अन्यथा दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी पासून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे.असा निवेदनात उल्लेख केला आहे.
सदरील निवेदनाच्या प्रति त्यांनी मा. मुख्य सचिव मंत्रालय मुंबई, मा. विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद, मा. जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, मा. कार्यकारी अधिकारी पंचायत समिती विभाग नांदेड, मा. पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड, मा. पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वजीराबाद नांदेड,मा. गटविकास अधिकारी प.स.कार्यालय भोकर, मा. ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय रिठ्ठा ता. भोकर जिल्हा नांदेड. यांनाही दिल्या आहेत. परंतु आता वरिष्ठ अधिकारी संबंधितावर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

308 Views
बातमी शेअर करा