KINWATTODAYSNEWS

शिक्षणाधिकारी (प्रा.) मा.डॉ.सौ.सविता बिरगे मॅडम यांची सदिच्छा भेट व चर्चा

नांदेड: इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन ( इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष तथा सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादीत जिल्हा परिषद नांदेडचे नवनिर्वाचित संचालक मा.बालासाहेब लोणे, लहानकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्रा.) मा.डॉ.सौ.सविता बिरगे मॅडम यांची सदिच्छा भेट घेवून वाढदिवस अभिष्टचिंतन केले व शिक्षकांच्या वेतन व इतर प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.
शिक्षकांच्या मासिक वेतनाबाबत दरमहा जिल्हा व राज्य पातळीवरुन होणारा विलंब दूर करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या निवडश्रेणी, चट्टोपाध्याय वेतनश्रेणी विनाविलंब प्रदान करण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले. बदली संवर्ग-३ च्या शिक्षकांवर होणाऱ्या गैरसोयीबाबत अवगत करण्यात आले. वरिष्ठ पातळीवर कळविण्याबाबत चर्चा झाली तसेच जि.प. प्राथमिक शाळा कौठा ता.नांदेड येथील निलंबित शिक्षकांच्या प्रश्नांबाबत लवकरात लवकर सुनावणी घेवून अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली. तेंव्हा मुकाअ मार्फत एका विशेष समितीमार्फत लवकरात लवकर या प्रकरणाची पारदर्शी चौकशी करुन अंतिम निर्णय घेण्याचे शिक्षणाधिकारी (प्रा.) मा.डॉ.सौ.सविता बिरगे मॅडम यांनी आश्वासित केले. तसेच याप्रसंगी मा.बालासाहेब लोणे हे शिक्षण पतपेढीच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत खूल्या प्रवर्गात विक्रमी १९५० मताधिक्क्याने निवडून आल्याबद्दल शिक्षणाधिकारी (प्रा.) मा.डॉ.सौ.सविता बिरगे मॅडम यांनी मा.बालासाहेब लोणे यांचे मनःस्वी अभिनंदन केले व भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार करण्याचीही इच्छा व्यक्त केली. मा.बालासाहेब लोणे यांनी शिक्षणाधिकारी महोदयांच्या सद्धभावना आभार व्यक्त करून सध्या आपण स्वतःच वाईट प्रसंगाला सामोरे जात आहात. जेंव्हा केंव्हा आमच्या सर्व संचालक मंडळाचा सत्कार होईल तेंव्हाच माझाही सत्कार करावा अशी इच्छा व्यक्त केली. चर्चे दरम्यान प्राथमिक शिक्षण विभागाचे कार्यालयीन अधिक्षक तथा माहूरचे गटशिक्षणाधिकारी मा.संतोष शेटकार यांची प्रमुख उपस्थित.

सदरील शिष्टमंडळात इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन ( इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष तथा सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादीत जिल्हा परिषद नांदेडचे नवनिर्वाचित संचालक मा.बालासाहेब लोणे, लहानकर, केंद्रीय कार्याध्यक्ष मा.बबनराव घोडके, मा.रमेशराव गोवंदे, सरचिटणीस मा.निलेश गोधने, मा.किशनराव गायकवाड, मा.शेख समदानी, मा.उत्तम कांबळे, मा.मिलिंद राऊत, मा.प्रकाश नांगरे, मा.रामदास गोणारकर, मा.विजय इंदूरकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती.*

232 Views
बातमी शेअर करा